मुंबई : राज्यात मान्सून (Monsoon) सक्रीय झाला असला तरी कोकणमधील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हे वगळता अन्य भागात पावसाने पुन्हा दडी मारली आहे. अधूनमधून तुरळक पाऊस होत आहे. मात्र, अजून आठवडाभर पावसाची शक्यता नाही. दरम्यान, मुंबई-ठाणे कोकणमध्ये मुसळधार पावसाचा (Heavy rains) इशारा देण्यात आला आहे. 17 आणि 18 जूनला मुसळधार पावसाचा शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तविली आहे. (Heavy rains are expected in Maharashtra in the next two days)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यात अजूनही सर्वत्र मौसमी पावसाचे आगमन झालेले नाही, त्यामुळे शेतकर्‍यांनी पेरणी करू नये, असे आवाहन कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी केले आहे. येत्या 17 ते 18 तारखेला राज्यात जोरदार पावसाचे आगमन होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तसेच 80 ते 100 मिलिमीटर पाऊस पडत नाही, तोपर्यंत पेरणीची कामे करू नयेत, असे कृषी खात्याने आवाहन केले आहे.



दरम्यान, जून अर्धा महिना संपला तरी अद्यापपर्यंत समाधानकारक पाऊस झाला नसल्याने शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. आज जळगाव जिल्ह्यत अनेक भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. तर वाशिम जिल्ह्यातील मालेगाव रिसोडसह वाशिमतालुक्यात मेघगर्जनेसह आज जोरदार पाऊस झाला. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कपाशी लागवडीसह सोयाबीनची पेरणी सुरू असल्याने या पावसाचा फायदा लागवड आणि पेरणी  केलेल्या पिकांस होणार आहे. त्यामुळे बळीराजा समाधानी आहे.


मात्र काही ठिकाणी आणि जिल्ह्यात अद्यापही पावसाची प्रतीक्षा आहे. या पावसावरच शेतकऱ्यांच्या पेरणीचे भवितव्य अवलंबून आहे. त्यामुळे काही भागात पाऊस झाला असला तरी सर्वत्र पाऊस कधी होणार आणि पेरण्या कधी होणार याकडेच बळी राज्यच लक्ष लागून आहे.