मुंबई : शहात अनेक ठिकाणी पावसाचा जोर दिसून येत आहे. मुंबईच्या पश्चिम उपनगरात पावसाचा जोर दिसून येत आहे. तर दादर, परेल परिसरात पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे सकल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली.  मुंबईत आज मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. गेल्या १२ तासांत शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. अधिक पावसाचा परिणाम पश्चिम उपनगरावर दिसून येईल, असे भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोकणमध्ये रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर कायम दिसून येत आहे. जोरदार वाऱ्यासह पाऊस कोसळत आहे. कालपासून सुरु झालेला पाऊस अद्याप थांबलेला नाही. त्यामुळे नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडलेली दिसून येत आहे. अनेक ठिकाणी पुराचे पाणी शहरांत घुसल्याचे चित्र दिसून येत आहे.



मुंबईत आज मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. गेल्या १२ तासांत शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. अधिक पावसाचा परिणाम पश्चिम उपनगरावर दिसून येईल, असे भारतीय हवामान विभागाच्या कुलाबा वेधशाळेने म्हटले आहे. दरम्यान, मुंबई आणि उपनगरात काही ठिकाणी चांगला पाऊस पडत आहे. नवी मुंबई अधूनमधून जोरदार दरी कोसळत आहेत.



रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर कायम दिसून येत आहे. रात्रभर पाऊस कोसळत आहे. हीच परिस्थिती रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिसून येत आहे. मंगळवार आणि बुधवारी दोन दिवस राज्यातील सात जिल्ह्यांना हवामान विभागाने रेड रेड अलर्ट दिला होता. आज दुसऱ्या दिवशीही चांगला पाऊस कोसळत आहे. मुंबई ,पुणे, ठाणे, रायगड ,रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि सातारा या जिल्ह्यात पावसाचा जोर कायम राहिल असा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तवला आहे. हा अंदाज पावसाने खरा दाखवून दिला आहे.



रायगड जिल्ह्यातील काही भागात पावसाची संततधार सुरुच आहे तर काही भागात जोर,ओसरला असला तरी पाऊस सुरुच आहे. सलग दुसऱ्या  दिवशीही महाड शहराला पुराचा विळखा बाजारपेठेत पाणी कायम होते. मात्र पाऊस या ठिकाणी थांबला आहे. सावित्री नदीचे पाणी अद्यापही धोका पातळीच्यावर आहे. घाटमाथ्यावर पाऊस असल्याने पाणीपातळी वाढ दिसून येत आहे. तर दुसरीकडे माणगाव, मुरुड, श्रीवर्धन आणि म्हसळा तालुक्यात संततधार सुरुच आहे. पाली पुलावरील पाणी ओसरले असले तरी रायगडजिल्ह्यातील नदी किनारी भागात सतर्कतेचा ईशारा देण्यात आला आहे.


सिंधुदुर्ग जिल्ह्यात कालपासून पावसाने जोर धरला आहे. जिल्ह्यात सगळीकडेच मुसळधार पाऊस पडतोय. काल रात्री पासून पावसाचा आणि वाऱ्याचा जोर वाढला आहे. त्यामुळे पडझडीच्या घटना झाल्या आहेत. सखल भागात पाणी साचले आहे. झाडे पडून काही ठिकाणचा वीज पुरवठा खंडित झाला आहे.  रस्त्यावर झाड पडल्याने वाहतुकसुद्धा ठप्प झाली होती.


बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार तर अरबी समुद्रात  चक्रीय  परिस्थिती निर्माण झाल्याने मान्सूनचा जोर  वाढवण्यास पोषक वातावरण निर्माण झाले आहे. कोकणात सात ऑगस्टपर्यंत तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात सहाऑगस्टपर्यंत तर विदर्भात आज मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.