मुंबई : कोकणात धुवांधार पाऊस कोसळत आहे. ( Heavy rains in Konkan) मुसळधार पावसाने रत्नागिरी जिल्ह्याला झोडपून काढले आहे. (Heavy rain in Ratnagiri )गेल्या दोन दिवसांपासून पाऊस कोसळत आहे. संगमेश्वरमधील गड नदीला आणि राजापूरमधील कोदवली नदीला पूर (Flood) आला आहे. पुराचे पाणी बाजारपेठेत घुसल्याने व्यापारी धास्तावले आहेत. दरम्यान, मुंबईसह कोकण, मराठवाड्यात दोन दिवस अतिवृष्टीचा (Heavy rain for the next two days) इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे.   


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुसळधार पावसामुळे संगमेश्वर तालुक्याला चांगलेच झोडपून काढले आहे.  त्यामुळे गडनदीला आलेल्या पुरामुळे माखजन बाजारपेठे पुराचे पाणी बाजारपेठेत शिरले होत. आधीच खाडीला भरती त्यात मुसळधार पाऊस त्यामुळे गडनदीच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाल्यामुळे माखजन बाजरपेठेत पुराचे पाणी शिरले होते.


राजापूरलादेखील मुसळधार पावसाचा फटका चांगलाच बसला आहे. मुसळधार पावसामुळे कोदवली नदीला पूर आल्याने राजापूरच्या जव्हार चौकात पाणी घुसले आहे. राजापूर तालुक्याला देखील मुसळधार पावसाने चांगलंच झोडपून काढलं आहे. तसेच अर्जुना नदी देखील दुथडी भरून वाहत असल्याने नदी किनारच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 



गेले अनेक दिवस हुलकावणी देणारा पाऊस पुढील दोन दिवसांत जोरदार कोसळणार आहे. दोन दिवसांत गडगडाट आणि कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस मुंबईसह कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा तसेच विदर्भात होईल, अशी माहिती मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्राने दिली आहे.


पावसाने दोन आठवडे दडी मारल्यानंतर शुक्रवारपासून राज्यातील अनेक ठिकाणी मध्यम ते हलका पाऊस सुरु आहे. राज्यात गेल्या 1 जूनपासून सरासरी पाऊस झाला आहे. मराठवाड्यात तर आतापर्यंत सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे, अशी माहिती मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्राचे प्रमुख डॉ. जयंत सरकार यांनी दिली आहे. 


मुंबईत ऑरेंज अॅलर्ट


मुंबईत पुढील चारही दिवस जोरदार ते मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. हवामाना विभागाकडून मुंबईत ऑरेंज अॅलर्ट जारी करण्यात आला आहे. 70 ते 120 मि.मी.पर्यंत पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. मुंबई महानगरपालिका प्रशासनही त्यादृष्टीने सतर्क झाले आहे.


कोकणात मुसळधार, रेड अॅलर्ट


कोकणात पुढील पाच दिवस जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पुढील दोन दिवस तर अति मुसळधार पाऊस कोकणात होईल असा इशारा हवामान विभागाने दिल्याने कोकणात रेड अॅलर्ट जाहीर करण्यात आला आहे. दक्षिण कोकणात सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीतील काही भागांमध्ये 210 मि.मी.पर्यंत पाऊस होण्याची शक्यता हवामान आहे.