सातारा : जिल्ह्यात पडलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. तर पावसाचा  फटका वाहतुकीला बसला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पहिल्यांदाच अचानक आलेल्या पावसाने सातारा, महाबळेशवर, वाई, खंडाळा, फलटण आणि कोरेगाव तालुक्यात मुसळधार पावसाने सर्वांचीच धावपळ उडाली. संध्याकाली चारच्या सुमारास झालेल्या पावसाने खंबाटकी घाटात वाहन चालकांची धांदल उडाली.


घाटात पावसाने रस्ता आहे की नदी हेच काही वेळ कळतं नव्हते. त्यामुळे वाहनचालकांनी मात्र काहीकाळ गाड्या घाटात उभ्या केल्या होत्या. यामुळे वाहनांच्या रांगा दिसून आल्या.


राज्यात दोन दिवसानंतर मान्सून सक्रिय


मान्सूनने राज्याचा ८० टक्के भाग व्यापला असून येणा-या दोन ते तीन दिवसानंतर मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राच्या उत्तर भागातही मान्सून सक्रीय होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तसंच दक्षिण मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली ,सातारा,सोलापुरातही चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. 


सध्या विदर्भातील यवतमाळ, अकोला आणि बुलढाणा आणि मराठवाड्याच्या ब-याचशा भागात मान्सून सक्रीय झाला आहे. अरबी समुद्रात पुन्हा मान्सून सक्रीय होण्यासाठी अनुकूल वातावरण तयार झाले असल्यानं मुंबईसह कोकणात दोन दिवसांमध्ये पावसाचा जोर वाढणार आहे.