Traffic Jam : पुण्यात रिक्षाचालकांचे आंदोलन (rickshaw drivers agitation) चिघळले आहे. रिक्षाचालकांनी आरटीओ कार्यालयाच्या समोरच आंदोलन करत चक्काजाम केला आहे. मोठ्या प्रमाणात रिक्षा एकाचवेळी रस्त्यावर आल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळतयं. रिक्षाचालक आणि आरटी अधिकाऱ्यांची चर्चा निष्फळ ठरल्यानंतर कार्यालयाच्या रस्त्यासमोर रिक्षा आडव्या लावण्यात आल्यात त्यामुळे वाहतूक कोंडी झालीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बाईक टॅक्सीच्या विरोधात पुणे शहरात सोमवारी पुन्हा एकदा रिक्षा बंदचा इशारा देण्यात आला होता. बाईक टॅक्सी विरोधी आंदोलन समितीकडून हा बंद पुकारण्यात आला. याआधीही रिक्षा संघटनांनी 28 नोव्हेंबरला बाईक टॅक्सीच्या विरोधात बंद पुकारण्यात आला होता. त्या वेळी मोठ्या संख्येने रिक्षाचालक बंदमध्ये सहभागी झाले होते.


त्यानंतर आता दुसऱ्यांदा प्रादेशिक परिवहन कार्यालयावर (RTO) मोठा मार्चा काढण्यात आला होता. गेल्यावळी प्रशासनाकडून सकारात्मक आश्वासन मिळाल्यामुळे बंद स्थगित करण्यात आला होता. त्यानंतर बंदमधील काही रिक्षा संघटनांमध्ये वाद निर्माण झाले होते. त्यामुळे समितीत फूट पडल्याचेही दिसून आले. आता पुन्हा एकदा अधिकाऱ्यांसोबत चर्चा फिसकटल्याने आंदोलन चिघळले आहे.