Pune Traffic : पुण्यात संध्याकाळपासून सुरू झालेली वाहतूक कोंडी कायम, नागरिकांना मनस्ताप
औंध चौक ते शिवाजीनगरपर्यंत प्रचंड वाहतूक कोंडी झालीय. संध्याकाळपासून वाहनांचा अगदी कासवगतीने प्रवास सुरूय.
पुणे : पुणेकरांसाठी (Pune Traffic) वाहतूक कोंडीचा विषय काय नवीन नाही. मात्र आज हद्दच झाली. संध्याकाळपासून सुरु झालेली वाहतूक कोंडी ही उशिरापर्यंत अजूनही कायम आहे. त्यामुळे सर्वसामांन्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागलाय. वाहतूक पोलिसांच्या नियोजनाअभावी ही परिस्थिती उद्भवल्याचं म्हटलं जातंय. (heavy traffic jam in pune aundh to shivaji nagar people frustred due to waste time)
रक्षाबंधनानिमित्ताने आज नेहमीपेक्षा रस्त्यावर अधिक गर्दी होती. प्रत्येकाला इच्छित स्थळी वेळेत पोहचायचं होतं. पण कसलं काय, संध्याकाळपासून झालेली वाहूतक कोंडी सुटण्याचा नाव घेत नाहीये. त्यामुळे वाहतुकीत अडकलेल्यांना पोलिसांच्या भोंगळ कारभारामुळे हा मनस्ताप सहन करावा लागलाय.
औंध चौक ते शिवाजीनगरपर्यंत प्रचंड वाहतूक कोंडी झालीय. संध्याकाळपासून वाहनांचा अगदी कासवगतीने प्रवास सुरूय. वाहतूक पोलिसांच्या नियोजनाअभावी ही परिस्थिती निर्माण झाल्याची तक्रार आहे. पुणेकरांनी रोज हा त्रास का सहन करायचा, तसेच या वाहतूक कोंडीला जबाबदार कोण, असा संतप्त सवाल वाहतूक कोंडीने हैराण झालेल्यांनी उपस्थित केला आहे.