Heavy Traffic Jam Sion Flyover Bridge Closed : मुंबईतील महत्त्वाचा असलेला 112 वर्षे जुना सायन ब्रिज जुना झाल्यानं 1 ऑगस्टपासून  वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय.. वांद्रे-कुर्ला संकुल, कुर्ला एलबीएस मार्ग, धारावी आणि सायन यांना जोडणारा हा उड्डाणपूल आहे. यामुळे  चार भागांच्या वाहतुकीवर परिणाम झालाय.. या उड्डाणपुलाचं काम दोन वर्ष चालणाराय. त्यामुळे या भागांत राहणाऱ्या नागरिकांना चांगलाच ताप होणाराय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सायन ब्रिज बंद केल्यानं ईस्टर्न एक्सप्रेस हायवे, बीकेसीपासून थेट चेंबूर सुमननगर जंक्शनपर्यंत वाहतूक कोंडी होतेय... घाटकोपरपासून सायन चुनाभट्टीपर्यंत दररोजची वाहतूक कोंडी होत असल्यानं नागरिकांना 10 मिनिटांच्या प्रवासासाठी तब्बल एक ते दीड तास खर्ची घालावा लागतोय..


सायन ब्रिज बंद केल्यानं या भागातील नागरिकांना प्रवासासाठी पर्यायी मार्गाची व्यवस्था करण्यात आलीय.. पश्चिम उपनगरातून येणारी वाहतूक टी जंक्शन मार्गावर वळवण्यात आलीय. तर दादर-माहिमकडून येणारी वाहतूक कुंभारवाडा जंक्शन मार्गे संत कबीर मार्गाने करता येणाराय.. त्याचप्रमाणे ठाण्याकडून येणारी वाहतूक चुनाभट्टी मार्गे वळवण्यात आलीय..


पुण्यातील अधिका-यांसोबत मुख्यमंत्री शिंदेंनी बैठक घेतलीय... बैठकीत विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली असून, पूरपरिस्थिती, खड्डे, वाहतूक कोंडी अशा अनेक समस्यांवर चर्चा केलीय. यासमस्यांवर उपाययोजना करण्यासाठी शिंदेंनी अधिका-यांसोबत बैठक घेतली..