मुंबई : राज्यातील सर्व महापालिका हद्दीतील इमारतींची उंची कमी होण्याची शक्यता आहे. (height of the buildings will be reduced) जानेवारी महिन्यापासून नवा नियम लागू होणार आहे. 36 मीटर उंचीची मर्यादा कमी होऊन 24 मीटरपर्यंत केली जाणार आहे. पुर्नविकासात अडचणी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे सदनिकांच्या किंमतीही वाढणार आहे. (Height of the building will be reduced in Maharashtra)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यातील महापालिका आणि नगरपालिकांमध्ये बांधकाम नियमावलीत एकसूत्रीपणा आणण्यासाठी हे पाऊल उचलले गेल्याचे सांगितले जात आहे. गतवर्षी राज्य सरकारने ‘यूडीपीसीआर’ (एकात्मिक बांधकाम विकास नियंत्रण) नियमावली लागू केली. त्यानुसार 36 मीटर उंचीपर्यंतच्या इमारती उभारण्यास परवानगी दिली. आता यात बदल होऊन 24 मीटर उंची असणार आहे.


सर्वसाधारण तीन मीटर उंचीचा एक मजला असतो. 36 मीटर उंचीमुळे 11 ते 12 मजली उंचीची इमारत होते. आता नव्या वर्षात नऊ मीटर रूंदीपर्यंतच्या रस्त्यावर इमारत उभारताना 24 मीटर उंचीची मर्यादा असणार आहे. त्यामुळे आता 11 ते 12 ऐवजी 7 मजली इमारत यापुढे पाहावयाला मिळणार आहे.



येत्या जानेवारी महिन्यापासून राज्यातील महापालिका हद्दीत हा नवा नियम लागू होणार आहे. मात्र, या नव्या नियमामुळे शहरातील पुर्नविकास बांधकामामध्ये अडचणी येणार आहे. तसेच या परिणाम हा घरांच्या किंमती वाढण्यावर होणार आहे.