नवी दिल्ली : बाईक अपघाताच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. यामध्ये काहीवेळा मुलंही बळी पडतात. बऱ्याचदा मुलांना बाईकवरून शाळेत सोडलं जातं. अशावेळी मुलांची सुरक्षितता अत्यंत महत्त्वाची आहे. ही गोष्ट लक्षात घेऊनन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयानं नवी नियमावली जारी केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बाईकवरून लहान मुलांना नेताना आता हेल्मेट सक्तीचं करण्यात आलं आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयानं याबाबत नवी नियमावली जारी केलीये. त्यानुसार 9 महिने ते 4 वर्षांपर्यंतच्या मुलांना दुचाकीवर बसवताना त्यांच्या मापाचं हेल्मेट बंधनकारक असेल. 



9 महिने ते 4 वर्षांपर्यंतच्या मुलांना घेऊन बाईकवरून 40 किलोमीटरपेक्षा जास्त अंतर जाता येणार नाही. असंही केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. देशात रस्ते अपघातांमध्ये बाईक अपघातांचं प्रमाण तब्बल 44 टक्के आहे. 2020 मध्ये बाईक अपघातांमध्ये तब्बल 58 हजार जणांचे बळी गेले आहे.


या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन रस्ते वाहतूक मंत्रालयानं आता कठोर उपाययोजना लागू केल्या असून मुलांना हेल्मेटचा नियम मोडल्यास बाईकस्वाराला मोठा दंड आकरण्यात येईल. दरम्यान, हा नवा नियम नोटिफिकेशन निघाल्याच्या 1 वर्षानंतर, म्हणजे 15 फेब्रुवारी 2023पासून लागू होईल, असं केंद्रीय माहिती प्रसारण केंद्रातर्फे स्पष्ट करण्यात आलं आहे. 


मुलांच्या हेल्मेटबाबत काय निकष ठरवण्यात आलेत? 
- मुलांच्या वजनापेक्षा हेल्मेट कमी वजनाचं असायला हवं
- वॉटर फ्रूफ आणि आतल्या बाजूला कुशन असणं बंधनकारक आहे. 
- 30 किलोपर्यंत वजन पेलता येईल एवढंच असायला हवं
- हेल्मेटबाबत नवी नियमावली लवकरच जारी केली जाणार आहे. 
- तोपर्यंत सायकलिंगसाठी उपयोगात येणारं हेल्मेट मुलांना देता येईल