इथं दारुबंदीचा निर्णय लागूच होत नाही कारण...
राष्ट्रीय आणि राज्य महामार्गापासून ५०० मीटरच्या आत असलेल्या हॉटेल्समधून मद्य विक्रीला सर्व्वोच्च न्यायलयाने बंदी घातल्यानतंर, महामार्गालगतची दारुची दुकानं बंद झाली आहेत. मात्र, महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नकाशात, राज्य महामार्ग हा उल्लेख नसून राज्यमार्ग उल्लेख आहे. त्यामुळे दारु बंदीच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाबाबत पेच निर्माण झालाय.
अहमदनगर : राष्ट्रीय आणि राज्य महामार्गापासून ५०० मीटरच्या आत असलेल्या हॉटेल्समधून मद्य विक्रीला सर्व्वोच्च न्यायलयाने बंदी घातल्यानतंर, महामार्गालगतची दारुची दुकानं बंद झाली आहेत. मात्र, महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नकाशात, राज्य महामार्ग हा उल्लेख नसून राज्यमार्ग उल्लेख आहे. त्यामुळे दारु बंदीच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाबाबत पेच निर्माण झालाय.
'अल्कोहोल टेक' ही पदवी घेतलेल्या अहमदनगर जिल्हयातल्या अकोले तालुक्यामधले संजय देशमुख यांनी माहीतीच्या अधिकारातून ही बाब उघड केली आहे.
अहमदनगर जिल्हयातल्या अकोले, संगमनेर, श्रीरामपूर, नेवासे, या तालुक्यांना जोडणारा मार्ग हा राज्य मार्ग असल्याचं सार्वजनिक बांधकाम विभागाकडून नमूद करण्यात आलंय.
त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागानं या मार्गांना राज्य महामार्ग दर्शवत इथली दारुची दुकानं बंद केल्याचा निर्णय तांत्रिकदृष्टया योग्य नसल्याचं देशमुख यांनी म्हटलंय.