डायग्नोस्टिक सेंटरमध्ये महिलांचे छुप्यारितीने मोबाईलमधून शुटिंग
सांगलीत प्राची डायग्नोस्टिक सेंटरमध्ये महिलांचे छुप्यारितीने मोबाईलमधून शुटिंग होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय.
सांगली : सांगलीत प्राची डायग्नोस्टिक सेंटरमध्ये महिलांचे छुप्यारितीने मोबाईलमधून शुटिंग होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय.
महिला चेंजिंग रूममध्ये धक्कादायक प्रकार
सोमवारी दुपारी शहरातील एक महिला तपासणीसाठी या सेंटरमध्ये आली होती. तपासणीनंतर कपडे बदलण्यासाठी ती महिला चेंजिंग रूममध्ये गेली. त्यावेळी तिला डिस्पोजेबल सिरिंज बॉक्स हलताना आढळून आला. शिवाय, त्यामध्ये एक मोबाईल व्हायब्रेट होत असल्याचे जाणवले. त्यामुळे घाबरलेल्या महिलेने पतीला चेंजिंग रूममध्ये बोलावून घेतले.
सूरज मुल्लाला अटक
त्यानंतर त्यांनी तो डिस्पोजेबल सिरिंजचा बॉक्स उघडून पाहिला असता त्यामध्ये कॅमेरा सुरू असलेल्या स्थितीत एक मोबाईल आढळून आला. त्यामुळे चिडलेल्या दाम्पत्याने याबाबत रूग्णालयातील कर्मचार्यांना जाब विचारला. तसेच त्या मोबाईलबाबत चौकशी केल्यानंतर तो सूरज मुल्लाचा असल्याचे समजले. पोलिसांनी सूरज मुल्लाला अटक केलीय. याबाबत सांगली शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलाय.