Chhatrapati Sambhaji Nagar Vs Aurangabad: महाराष्ट्रात अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या नामांतराच्या विषयावर केंद्र सरकारने अखेर मोहर लावली होती. केंद्राने नामांतराच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आणि औरंगाबाद (Aurangabad) आणि उस्मानाबाद (Osmanabad) या दोन शहरांची नावं बदलण्यात आली. औरंगाबादचं नामांतरण छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) करण्यात आलं. त्यावरून अनेक वाद देखील समोर आले होते. त्याचबरोबर ठिकठिकाणी आंदोलनं झाली. अशातच आता प्रकरण उच्च न्यायालयात (Mumbai High Court) गेलं असून मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट सुचना दिल्या आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जोपर्यंत नामांतर प्रकरणाबाबत अंतिम निर्णय होत नाही तोपर्यंत औरंगाबादचं नाव सरकारी दस्तावेजांवर बदलू नका, अशा सूचना मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहे. केंद्राच्या निर्णयाविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. त्यानंतर आता छत्रपती संभाजीनगर नव्हे, आता औरंगाबाद हे नाव वापरा सरकारी दस्तावेजांवर वापरावं लागणार आहे. या संपूर्ण प्रकरणावर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.


इम्तियाज जलील म्हणतात...


कोर्टाची आजची टिप्पणी ही शहरबाबत नाही तर जिल्ह्याबाबत आहे, कारण शहराच्या नावबाबत जीआर निघाला आहे मात्र तरी ही सरकारची घाईच होती अशी प्रतिक्रिया इम्तियाज जलील यांनी दिलीये. सरकारने हुकूमशाही असल्यासारखा निर्णय घेतला होता त्यावर आता चपराक बसलीय, राहिला प्रश्न तर कोर्टाचा जो निकाल येईल, जसाही असेल तो मान्य असेल मात्र आता यावरून शहरात अशांतता होणार नाही याची काळजी घ्या, असंही इम्तियाज म्हणाले आहेत.


आणखी वाचा - Maharastra News: धाराशिव नाही, आता 'हे' नाव वापरा, उच्च न्यायालयाचा महत्वाचा आदेश!


दरम्यान, बीआरएस आज सभा घेतेय पक्ष म्हणून कुणीही येऊ शकत मात्र चांगली राजनीती करा. राज्यात राजकारण बिघडलेले आहे त्याचा भाग होऊ नका चांगलं राजकारण करायचं असेल तर स्वागत आहे, असं इम्तियाज म्हणाले, तर तेलंगणामध्ये आमची त्यांच्या सोबत युती होती मात्र इथं असे काही नाही आणि याबाबतचा निर्णय ओवेसी घेतील आम्ही यावर बोलू शकत नाही, असंही इम्तियाज म्हणाले आहेत.