Osmanabad Name Change: उस्मानाबाद (Osmanabad) जिल्ह्याचे व तालुक्याचे नाव हे धाराशिव न वापरता उस्मानाबाद वापरा, असा आदेश उच्च न्यायालयाने (High Court) दिला आहे. पुढील सुनावणी 6 जून रोजी होणार असून 10 जूनपर्यंत उस्मानाबाद हे नाव वापरा असं कोर्टाने म्हटलं आहे. धाराशिव (Dharashiv) हे जिल्ह्याचे व तालुक्याचे नाव शासकीय व इतर कामकाजासाठी वापरू नये, असा आदेश उच्च न्यायालयाने (High Court On Dharashiv) दिला आहे.
महसूल व जिल्हा परिषद विभागाकडून उस्मानाबाद जिल्ह्याचे व तालुक्याचे नाव धाराशिव असे वापरले जात होते, त्याबाबत आजच्या सुनावणीत पुरावे व प्रशासकीय पत्रव्यवहार कोर्टात सादर करण्यात आलं होतं, त्यानंतर कोर्टाने या महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत.
संपूर्ण उस्मानाबाद जिल्ह्याचे व उस्मानाबाद तालुका नाव बदलन्याची प्रक्रिया सध्या सुरु असून आक्षेपावर सुनावणी सुरु आहे. केवळ उस्मानाबाद शहराचे नाव हे धाराशिव केलं आहे. त्यामुळे शहरासाठी धाराशिव हे नाव वापरता येणार आहे.
दरम्यान, जिल्ह्याचे व तालुक्याचे नाव हे धाराशिव वापरू नये, ते उस्मानाबाद असं वापरावे असं कोर्टाने नमूद केलं आहे. याचिकाकर्ते याचे वकील ऍड प्रज्ञा सतीश तळेकर यांनी याबद्दल माहिती दिली आहे.
उस्मानाबादचे नाव धारासूर या राक्षसाच्या नावावरुन धाराशीव करण्याच्या विरोधात दोन नवीन याचिका मुंबई उच्च न्यायालयात (High Court) दाखल करण्यात आल्या होत्या. केवळ धर्मांध लोकांच्या मागणीवरून उस्मानाबादचे नाव धारासूर राक्षसाच्या नावावर धाराशीव असे बेकायदेशीररित्या करण्यात येत आहे, असा आरोप करण्यात आला होता.