नागपूर : विदर्भात सूर्याचा प्रकोप वाढत चालला असून संपूर्ण विदर्भच होरपळून निघत आहे. आज नागपुरात या मोसमातील उच्चांकी ४६.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली.
नागपूरसह अकोल, चंद्रपूर, अमरावती, वर्धा ,यवतमाळ येथेही तापमान ४५ पेक्षा जास्त होतं. शुक्रवारी यंदाच्या मोसमात प्रथमच पारा ४५ अंश सेल्सिअसच्या पुढे गेला होता. त्यानंतर लगोपाठ दुस-या दिवशी सूर्याचा तडाखा अजून वाढला आहे, पुढील काही दिवस उष्णतेची ही लाट कायम राहणार आहे.  तर शनिवारी सकाळपासूनचं नागपुरात चटके बसणारं ऊन होतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विदर्भात सूर्याचा प्रकोप
नागपूर - ४६.५ अंश सेल्सिअस तापमान
अकोला- ४६ अंश सेल्सिअस तापमान
अमरावती - ४६.६ अंश सेल्सिअस तापमान
चंद्रपूर -४६.६ अंश सेल्सिअस तापमान
वर्धा - ४६.५ अंश सेल्सिअस तापमान
यवतमाळ - ४५.२ अंश सेल्सिअस तापमान
गोंदीया - ४५.४ अंश सेल्सिअस तापमान
नागपूर - ४६.६ अंश सेल्सिअस तापमान


अशी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तळपणारा सूर्य आणि भाजून निघणारं अंग, यामुळं विदर्भवासीय पुरते त्रासले आहेत. त्यामुळे त्यांचे डोळे आता मान्सूनकडे लागले आहेत.