Mumbai Hijab Controversy :  काही दिवसांपूर्वी कर्नाटकात हिजाबचा वाद पेटला होता. याचे पडसाद महाराष्ट्रातही उमटले होते. यानंतर आता पुन्हा एकदा हा हिजाबचा वाद चर्चेत आला आहे.  मुंबईच्या चेंबूर येथील आचार्य कॉलेजमध्ये हिजाबला परवानगी नाही. हिजाब घातलेल्या मुलींना गेटवर अडवण्यात आले. मुलींना हिजाब घालून कॉलेजमध्ये येणायची परवानगी देण्याची मुस्लीम मुली आणि पालकांनी केली आहे.  या प्रकारामुळे कॉलेजबाहेर  विद्यार्थी आणि पालक चांगलेच आक्रमक झाले होते. 


नेमका काय आहे प्रकार?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईत चेंबूरच्या एनजी आचार्य कॉलेजमध्ये हिजाब घालणा-यांना प्रवेश नाकारण्यात आला. एन जी आचार्य कॉलेजमध्ये अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना ड्रेस कोड लागू करण्यात आलाय. त्यानंतर हिजाब घालून आलेल्या विद्यार्थिनींना गेटवरच अडविण्यात आलं. कॉलेजनं ठरवून दिलेला युनिफॉर्मच घालावा, अशी माहिती विद्यार्थी आणि पालकांना 1 मे लाच देण्यात आली होती. त्यामुळे हिजाब घालणा-यांना अडवण्यात आल्याचं कॉलेजचं म्हणणं आहे. तर कॉलेजमध्ये हिजाब आणि ओढणीला परवानगी द्यावी अशी मागणी मुस्लीम विद्यार्थी आणि पालकांनी केलीय. 


कॉलेज बाहेर विद्यार्थी आणि पालकांचा गोंधळ


चेंबूर येथील एन जी आचार्य कॉलेजमध्ये अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना ड्रेस कोड लागू केल्यानंतर हिजाब घालून आलेल्या विद्यार्थिनींना गेटवरच अडविण्यात आले.  त्यामुळे या कॉलेज बाहेर विद्यार्थी आणि पालकांनी एकत्र येत कॉलेज प्रशासनाच्या या भूमिकेचा विरोध करत हिजाब घालून विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये प्रवेश दिला जावा अशी मागणी करत गोंधळघातले. 1 ऑगस्ट पासून युनिफॉर्म घालूनच विद्यार्थी कॉलेजमध्ये प्रवेश करतील अशा सूचना कॉलेजतर्फे देण्यात आल्या होत्या अशी भूमिका कॉलेज प्रशासनाकडून मांडण्यात आली. तर, हिजाब घालून विद्यार्थिनींना कॉलेजमध्ये प्रवेश दिला जावा. रस्त्यावर विद्यार्थिनी हिजाब काढून कॉलेजमध्ये प्रवेश करणार नाहीत. यासोबतच विद्यार्थिनींना दुपट्टा घालण्याची परवानगी दिली जावी अशी मागणी विद्यार्थी आणि पालकांनी केली.  हिजाब घातलेल्या मुलींना कॉलेजमध्ये प्रवेश नाकारल्यानंतर काही काळ कॉलेज बाहेर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते त्यामुळे या ठिकाणी पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता.


हिजाब घातला म्हणून रेस्टॉरंटमध्ये प्रवेश नाकारला


हिजाब घातला म्हणून रेस्टॉरंटमध्ये प्रवेश नाकारल्याची घटना मुंबईतल्या वरळीमधील एका रेस्टॉरंटमध्ये घडली होती. हिजाब काढून आत या अशी सक्ती केल्याचा आरोप या महिलेनं केला होता. तिनं याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला होता. यावर अनेक संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. मनसे कार्यकर्त्यांनी रेस्टॉरंटमध्ये जाऊन त्या रेस्टॉरन्टच्या मालकाला माफी मागण्याची ताकीद दिली होती. तर, मुंबई पोलिसांनीही रेस्टॉरंट मालकाला समज दिली. दरम्यान सुरक्षेचं कारण सांगत रेस्टॉरंट मालकाने महिलेची माफी मागितली होती.