हिंगणघाट जळीतकांड : पीडित तरूणी व्हेंटिलेटरवर
पीडित तरूणीची प्रकृती खालावली
नागपूर : हिंगणघाट जळीतकांडातील पीडितेची प्रकृती खालावली आहे. काल पेक्षा आज तिची परिस्थिती खालावली आहे, काल मध्यरात्री ऑक्सिजनची मात्रा वाढवण्यासाठी व्हेंटिलेटर लावण्यात आले आहे. शिवाय तिच्यावर शस्त्रक्रिया देखील करण्यात येणार आहे. पीडितेची प्रकृती नाजूक आहे. आज तिच्यावर ड्रेसिंग करण्यात येणार नाही, तर स्टेबिलाईज करणे आवश्यक आहे. पीडित तरूणी आता पूर्णपणे शुद्धीवर आली आली असली तरी तिची प्रकृती चिंताजनक असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. तिने डोळे उघडले आहेत. तिची दृष्टी पूर्णपणे आहे
वर्धा जिल्ह्यामधल्या हिंगणघाट जळीतकांडातील आरोपी विकेश नगराळे याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. विकेश नगराळेची पोलीस कोठडी आज संपल्यामुळे पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केलं.
मात्र नागरिकांचा त्याच्याविरोधात असलेल्या तीव्र संतापामुळे, कुठलाही अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांनी त्याला सकाळी लवकर गोपनीय पद्धतीनं कोर्टात हजर केलं
हिंगणघाट जळीत कांडप्रकरणातील पीडितेच्या तब्येतीचा अहवाल समोर आला आहे. प्रकृती स्थिर असली तरी नाजूक आहे. एकतर्फी प्रेमातून पीडित तरुणीला जाळण्याचा धक्कादायक प्रकार घडला. पीडितेची प्रकृती स्थिर पण चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
संतापाची लाट
हिंगणघाट शहरात नागरिकांचा मोर्चा सुरु झाला असून यामध्ये विविध सामाजिक संघटना, नागरिक आणि विद्यार्थी सहभागी झाले आहेत. पीडित मुलगी मृत्यूशी झुंज देत आहे. तिच्या प्रकृती अजूनही चिंताजनक आहे. हिंगणघाटमधल्या तरुणामध्ये या घटनेबाबत संतापाची लाट पसरलीय.