हिंगणघाट तरुण शिक्षिका जळीत प्रकरण, मेडिकल बुलेटिन अपडेट
पीडित शिक्षिकेच्या तब्येतीची माहिती समोर
वर्धा : वर्ध्यातील हिंगणघाटमध्ये तरुण शिक्षिकेला जाळणाच्या धक्कादायक प्रकार घडलाय. यातील आरोपीला अटक करण्यात आली असून संतप्त नागरिकांनी आज हिंगणघाट बंदचा नारा दिला आहे. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा करण्याची मागणी यावेळी करण्यात येत आहे. दरम्यान पीडित शिक्षिकेच्या तब्येतीची माहिती समोर आली आहे.
मेडिकल बुलेटीननुसार पिडितेच्या श्वसन नलिकेत धूर गेला असून तिचे दात काळे झाले आहेत. तोंड आतून जळले असून चेहरा विद्रुप झाला आहे. कृत्रिमरित्या तिचा श्वास सुरू असून डेड स्किन काढली आहे. ती सध्या अतिदक्षता विभागात असून 72 तास महत्वाचे आहेत. एक दीड महिना मेहनत घ्यावी लागेल असे सांगण्यात येत आहे.
ऑक्सिजन ची मात्र वाढवली आहे, अजूनही पुढे जाऊन कमी होऊ शकते पीडितेची तब्येत काल पेक्षा थोडी बरी पण इन्फेक्शन होण्याचा धोका नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्वचा नसल्याने किटाणू शरीरात जातात. 1-2 दिवसांत इन्फेक्षन माहिती पडेल. तिच्या त्वचेचे पाचही लेव्हल जाळले असल्याने धोका कायम असल्याचे सांगण्यात येत आहे.
संतापाची लाट
हिंगणघाट शहरात नागरिकांचा मोर्चा सुरु झाला असून यामध्ये विविध सामाजिक संघटना, नागरिक आणि विद्यार्थी सहभागी झाले आहेत. या प्रकरणात अटकेत असलेल्या आरोपीला आज कोर्टात हजर करण्यात येणार आहे. तर दुसरीकडे पीडित मुलगी मृत्यूशी झुंज देत आहे. तिच्या प्रकृती अजूनही चिंताजनक आहे. हिंगणघाटमधल्या तरुणामध्ये या घटनेबाबत संतापाची लाट पसरलीय.