वर्धा : निर्भयाला न्याय मिळाला त्याचा आनंद होत आहे. आता माझ्याही मुलीला लवकरात लवकर न्याय मिळावा अशी मागणी हिंगणघाट जळीत कांडातील तरुणीच्या आईनं सरकारकडे केली आहे. महिलांवर अत्याचार करणाऱ्यावर कडक कायदा झाला पाहिजे असेही त्या म्हणाल्यात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशाला हादरवणाऱ्या दिल्ली निर्भया बलात्कार घटनेतल्या चौघाही दोषींना अखेर फाशी देण्यात आली. संपूर्ण देश ज्याची वाट पाहत होता ती घटना अखेर घडली.  सकाळी साडे पाच वाजता मुकेश सिंह, विनय शर्मा, पवन गुप्ता आणि अक्षय ठाकूर या चौघा विकृतीच्या व्हायरसना फासावर लटकवण्यात आलं. तिहार तुरुंगात पवन जल्लाद यांनी या चौघांना फाशी दिली. निर्भयाच्या आरोपींना फासावर लटकवल्यामुळे अखेर ७ वर्षांनी न्याय मिळाला असल्याचं मत निर्भयाच्या आई-वडिलांनी व्यक्त केलं. हा आमच्या मुलीसाठीचा लढा असला तरीही प्रत्येक मुलीला न्याय मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. यापुढे असे कृत्य करताना आरोपी नक्कीच दहा वेळा विचार करेल असं सांगत न्यायव्यवस्थेचं त्यांनी आभार मानले.


वर्ध्यातील हिंगणघाटमध्ये तरुण शिक्षिकेला जाळण्यात आले होते.  जाळणारा आरोपी विकेश नगराळे याला अटक करण्यात आली आहे. तर हा खटला जलदगती न्यायालयात चालवला जाईल, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. हिंगणघाट येथे एकतर्फी प्रेमातून शिक्षिकेला पेटवल्याच्या घटनेचा सर्वत्र निषेध व्यक्त होत आहे.  या घटनेच्या पार्श्वभूमीवर आज दिल्लीतील निर्भाय प्रकरणी चारही दोषींना फाशी देण्यात आली. असाच मला न्याय मिळाला पाहिजे, अशी मागणी हिगणाघाट पीडीत तरुणीच्या आईने केली आहे. 


हिंगणघाट जळीतकांडातील पीडित शिक्षिकेबाबत झालेल्या ह्रदयद्रावक घटनेचे तीव्र पडसाद अवघ्या महाराष्ट्रभर उमटले आहे. तिला वाचवण्यासाठी डॉक्टरांनी देखील शर्थीचे प्रयत्न सुरू होते. डॉक्टरांनी तिला फुलराणी असे नाव दिले होते. तर ही फुलराणीचे स्वप्न अपूरे राहिले आहेत.