गजानन देशमुख, झी मीडिया, हिंगोली : संभाजीनगरमध्ये (sambhaji nagar)  चिखलातील रस्त्याने एका 10 वर्षीय मुलाचा जीव घेतल्याची घटना ताजी असतानाच आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संभाजीनगरमध्ये पोटात दुखत असल्याने उपचारासाठी वडील मोटार सायकलवरून दवाखान्यात नेत असताना बाईक रस्त्यामधल्या चिखलात फसली आणि दवाखान्यात जाण्यापूर्वीच मुलाचा मृत्यू झाला. कृष्णा बाबुलाल परदेशी असं या चिमुरड्याचं नाव होतं.


रस्त्याच्या दुरावस्थेमुळे विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत असल्याचा प्रकार हिंगोलीमध्ये (hingoli)घडत आहे. हिंगोली जिल्ह्यातील अंतर्गत रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. वसमत तालुक्यातील आडगाव ढवूळगाव मार्ग अनेक वर्षापासून खराब झाला आहे.


थोड्याश्या पावसातही या रस्त्याचे रुपांतर चिखलात होतं. त्यामुळे यावरुन धड चालणंही अवघड होतं. याच चिखलातून ढवूळगाव येथील विद्यार्थ्यांना शाळेसाठी आडगाव येथे जावे लागते. 



पावसामुळे ढवूळगाव ते आडगाव या 7 किलोमीटर रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. आडगाव ते ढवूळगाव रस्त्यावरुन वाळूची वाहतूक होत असल्याने या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. 


परिणामी विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी जीप चिखलात फसल्याने लहानग्या विद्यार्थ्यांनाच गाडीला धक्का देण्याची वेळ आली. यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचलाय उशीर तर होतोच पण चिखलाने माखलेले कपडे घेऊन शाळेत जावं लागत आहे. पक्का रस्ता नसल्यामुळे प्रत्येक पावसाळ्यातील नित्य क्रम बनला आहे.