Beed Crime News : मुलं वृद्ध आई वडिलांकडे लक्ष देत नाहीत. त्यांना घराबाहेर काढतात अशा घटना नेहमीच घडत असतात.  राष्ट्रवादीच्या आमदाराने वडिलांना धक्काबुक्की करून घराबाहेर काढल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी  पोलिस ठाण्यात तक्रार देखील दाखल झाली आहे. बीडचे विद्यमान आमदार संदीप क्षीरसागरांविरोधात (MLA Sandeep Kshirsagar) त्यांच्या वडिलांनीच पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बीड विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर यांच्या विरोधात बीड मधील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अदाखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदीप क्षीरसागरांचे वडील रवींद्र क्षीरसागर यांच्या फिर्यादीवरून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


संदीप क्षीरसागरंसह त्यांचे भाऊ अर्जुन क्षीरसागर यांच्यावर देखील गुन्हा दाखल झाला आहे. भारतीय दंड संगिता कलम 323, 504, 506, 34 अंतर्गत क्षीरसागर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करीत आहेत. कौटुंबिक कारणावरून संदीप क्षीरसागर आणि अर्जुन क्षीरसागर या दोघा भावांनी वडील रवींद्र क्षीरसागर यांना धक्काबुक्की करून घराबाहेर काढण्याचा प्रकार घडला असल्याचे समजते. 


स्वतः रवींद्र क्षीरसागर यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात ही तक्रार दिली आहे. दरम्यान या घटनेनंतर बीडच्या राजकारणात एकच उडाली आहे. मात्र, पोलिसांनी याबाबत अद्यापही कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.


चार महिन्यानंतर आली आईची आठवण 


दिल्लीतल्या (Delhi) ग्रेटर नोएड परिसरातील सेक्टर एकमधल्या एका घरात 70 वर्षांच्या अमिया सिन्हा या वृद्ध महिलेचा मृतदेह (Dead Body) आढळला होता. मात्र, त्यांच्या मृत्यू मागचे खरं कारण समोर आल्यावर डोळ्यात पाणी आणणारे वास्तव समोर आले आहे. अमिया यांच्या पतीचे निधन झाल्यानंतर त्या आपल्या मुलासह येथे राहत होत्या.  लग्नानंतर मुलगा देखील पत्नीसोबत दुसरीकडे रहायला गेल्या. यामुळे त्या एकट्याच येथे राहत होत्या. चार महिने मुलगा त्यांच्या संपर्कात नव्हता त्याने साधं आईचं विचारपूस देखील केली नाही. चार महिन्यानंतर मुलाला आईची आठवण झाली. त्याने आईला फोन करुन चौकशी करण्याचा प्रयत्न केला. पण फोन स्विच ऑफ येत होता. यामुळे त्याने घर गाठले. बराचवेळ दार वाजवून देखील काहीच प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे मुलाने दरवाजा तोडला. आत जे दिसलं ते पाहून त्याच्या पायाखालची जमीन सरकली. संपूर्ण घरात एक उग्र वास कोंडला होता. आई बेडवर निपचीत पडली होती. आईजवळ त्याला एक सुसाईड नोट सापडली. यात आईने आपल्या सर्व व्यथा मांडून जीवन संपवले होते.