जालना : इलेक्ट्रॉनिक डिव्हाईसच्या माध्यमातून कॉपी करणाऱ्या मुन्नाभाईना जालन्यामध्ये  अटक करण्यात आलीय. विशेष म्हणजे हे परिक्षार्थी जालना  नगर परिषदेच्या पालिका आस्थापनेवरील पदाची परीक्षा देत होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कृष्णा भवर, कृष्णा दांडगे, नलालसिंग सुंदर्डे, प्रदीप सुलाने, प्रदीप गुसिंगे अशी आरोपींची नावं आहेत. सर्व आरोपी औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातील  आहेत. या पाचही जणांनी शर्टच्या आतील भागात छातीजवळ बसवून शर्टच्या बटनाला डिव्हाईसचा कॅमेरा जोडला. 


शिवाय कॅमेरा कंट्रोल करण्यासाठी डिव्हाईसचं ब्ल्यूटूथ पँटच्या खिशाला बसवलेल होत. प्रश्नपत्रिका छातीसमोर पकडून कॅमेराच्या सहाय्याने प्रश्नपत्रिकेचा फोटो स्कॅन करुन प्रश्नपत्रिका आपल्या औरंगाबाद मधील अज्ञात मित्रांकडे पाठवत होते. त्यांच्याकडून आलेलं उत्तर या मुन्नाभाईना मानेजवळ बसवलेल्या लहान स्पीकरच्या माध्यमातून मिळत होत. 


भरारी पथकाला संशय आल्यामुळे त्यांनी तपासणी केली असता मोबाईला मिळाला तेव्हा या पाच हायटेक कॉपीबहाद्दर आणि दोन डमी परिक्षार्थींना अशा सात जणांना परिक्षा केंद्रावरून अटक केली. या प्रकारामुळे पोलीस देखील चक्रावून गेले. आता या प्रकरणाचा भांडाफोड करण्यासाठी एक पथक स्थापन करत सखोल चौकशी सुरु केलीये.