COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बीड : एचआयव्ही बाधितांना समाजात सन्मान देऊन मानसिक आधार देण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र, काही ठिकाणी आजही त्यांना तुच्छ वागणूक दिली जातेय. बीड तालुक्याच्या पाली इथल्या जिल्हा परिषद शाळेतून एचआयव्ही बाधित पाच विद्यार्थ्यांना शाळेबाहेर काढल्याचा प्रकार बुधवारी घडला.


याप्रकरणी पालकमंत्र्यांकडे तक्रार करण्यात आलीय. याची चौकशी करून योग्य ती कारवाई न झाल्यास सत्याग्रह, बेमुदत उपोषण करण्याचा इशाराही इन्फंट इंडिया संस्थेनं दिलाय. दरम्यान मुलांना हाकललं नसल्याची प्रतिक्रिया मुख्याध्यापक कांतीलाल लाड यांनी दिलीय. 


पालीमधल्या 6वी ते दहावीपर्यंतच्या जिल्हा परिषद शाळेत याच प्रकल्पातले 28 विद्यार्थी शिक्षण घेतायत. इन्फंट प्रकल्पात पहिली ते पाचवीपर्यंतची शाळा आहे. त्या मुलांनी या शाळेत प्रवेश घेतलेला नाही. 



इन्फंटचे शिक्षक जावेद हेच या मुलांना घेऊन परत प्रकल्पावर गेले.मुलांना आम्ही हाकललं नाही अशी प्रतिक्रिया मुख्याध्यापकांनी दिलीय.