घराचं धाबं कोसळून ४ जण ठार
जळगाव जिल्ह्यातील पारोळा शहरात आज पहाटे सकाळी छत कोसळून झालेल्या घटनेत ४ जणांचा मृत्यू झाला आहे.
जळगाव : जळगाव जिल्ह्यातील पारोळा शहरात आज पहाटे सकाळी छत कोसळून झालेल्या घटनेत ४ जणांचा मृत्यू झाला आहे. हे छत मातीचं म्हणजेच धाब्याचं होतं, तसेच या घटनेत एक जण बचावला आहे. मातीचं हे छप्पर कोसळून सायराबी काझी, असिम काझी , मोईन काझी आणि शबीना काझी यांचा मृत्यू झाला आहे.
वसीम काझी याला वाचवण्यात यश आलं आहे. पहाटे पाच वाजेची काझी वाड्यातील घटना आहे. अचानक मातीचं छत कोसळल्याने कोणती व्यक्ती नेमकी कुठे दबली गेली आहे, हे समजणे कठीण असल्याने, बचावकार्यात उशीर झाला.
घरावर छपरात लाकडी दांड्यांवर पालापाचोळा टाकून खान्देशात मातीच छत म्हणजेच, धाब्याची घरं बांधली जातात, घरात थंडावा प्रखर उन्हाळ्यातही कायम रहावा, म्हणून धाब्याची घरं बांधली जातात.