होमिओपॅथी डॉक्टर देणार अॅलोपॅथीची औषधे! निर्णयाचे काय परिणाम होऊ शकतात?
Homeopathy Doctor: राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासनानम राज्यातील डॉक्टरांसाठी एक मह्तवाचा निर्णय घेतलाय.
Homeopathy Doctor: राज्यातील डॉक्टरांसाठी एक महत्वाचा निर्णय घेण्यात आलाय. आता होमिओपॅथी डॉक्टरांना अॅलोपॅथी औषधे देण्याची परवानगी देण्यात आलीये. या निर्णयानंतर मात्र डॉक्टरांमध्ये दोन मतप्रवाह पाहायला मिळतायेत. काहींनी निर्णयाला तीव्रपणे विरोध केलाय. तर काहींनी निर्णय चांगला असल्याचं म्हंटलंय. पण या निर्णयाचे काय परिणाम होऊ शकतात.
राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासनानम राज्यातील डॉक्टरांसाठी एक महत्वाचा निर्णय घेतलाय. या निर्णयामुळे होमिओपॅथी डॉक्टरांना आता अॅलोपॅथी औषधंही देता येणार आहेत. महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या 'सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकॉलॉजी' हा सेतू अभ्यासक्रम पूर्ण करणारे होमिओपॅथी डॉक्टर यासाठी पात्र ठरतील.हा कोर्स केलेले होमिओपॅथी डॉक्टर आपल्या रुग्णांना अॅलोपॅथीची औषधं लिहून देऊ शकतात.
या निर्णयामुळे राज्यातील होमिओपॅथी डॉक्टरांचा आवाका वाढणार आहे. या डॉक्टरांना आपल्या रुग्णांना गरजेवेळी अॅलोपॅथीची औषधंही लिहून देता येणार आहेत. मात्र ही औषध विक्री करताना औषध चिठ्ठीवर नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकांचा नोंदणी क्रमांक आणि सीसीएमपी प्रमाणपत्राचा क्रमांक नमूद करणं आवश्यक आहे. औषध चिठ्ठीवर या बाबी नमूद असल्याची खात्री करण्याची जबाबदारी औषध विक्रेत्यावर सोपविण्यात आली आहे. मात्र अॅलोपॅथी डॉक्टरांकडून याचा विरोध होत आहे.
एका वर्षात फार्माकोलॉजीच्या कोर्सने सर्व ड्रग्जची माहिती समजणार नाही. अपु-या माहितीमुळं रूग्णांचे आरोग्य धोक्यात येवू शकतं. या निर्णयामुळे अॅलोपॅथी डॉक्टरांची प्रॅक्टीस कमी होऊ शकते. सध्या राज्यात अँलोपॅथी, होमिओपॅथी डॉक्टरांची संख्या मुबलक आहे.आपल्या गरजेनुसार रुग्ण उपचारपद्धती घेत असतात. आता या निर्णयामुळे डॉक्टरांचा फायदा होईल की रुग्णांची आरोग्य स्थिती बिघडेल हे पाहावं लागेल.