निलेश खरमरे, पुणे : पुण्याच्या वेल्हे तालुक्यात उन्हाळी शिबिरासाठी आलेल्या दोनशे जणांना मधमाशा चावल्या आहेत. शिवशौर्य साहसी बालसंस्कार शिबिरासाठी एक ग्रुप पुण्यातून वेल्ह्यात आला होता. त्यात १५१ मुलं, १५ शिक्षक आणि इतर ३७ स्वयंसेवक अशा जवळपास दोनशे जणांवर मधमाशांनी हल्ला चढवला. या घटनेमुळे साहसी बालसंस्कार शिबिरांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजगडाच्या पायथ्याशी असलेल्या गुंजवणे गावात प्राध्यापक गजानन व्हावळ यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही उन्हाळी शिबीराचं आयोजन केलं होतं. मुलांना शिवशौर्य,साहसी, बालसंस्कार निसर्ग यांची माहिती व्हावी यासाठी या शिबिराचं आयोजन केलं.. मात्र पहिल्याच शिबिराची सांगता झाली ती आग्या मोहोळाच्या माशांमुळे.. मुलं, प्रशिक्षक स्वयंसेवक अशा दोनशेजणांना या मधमाशांनी थेट रुग्णालयात पोहोचवलं.  


भडक केशरी रंगाचे कपडे घालून ही मुंल मंदिरात जमा झाली होती.. कपड्यांचा रंग आणि वास याकडे शिबिरालगतच्या झाडावरील मध माशा आकर्शित झाल्या आणि त्यांनी मुलांवर हल्ला केल्याचं गावकरी सांगत आहेत. गावकऱ्यांनी जिवीची पर्वा न करता या मुलांना वाचवलं. आणि त्यांना वेल्हा, नसरापूर या ठिकणी उपचारासाठी हलवलं..


योग्य ती काळजी घेतली असतीतर हा प्रसंग टाळता आला असता. निसर्गात फिरायचं तर निसर्गाच्या नियमांचं पालन करावंच लागतं हे या घटनेतून दिसून येतं आहे.