विशाल करोळे, झी २४ तास, औरंगाबाद : मॉलमध्ये किंवा एखाद्या प्रेक्षणीय स्थळांवर फिरताना सावधान... एखादी सुंदर मुलगी तुम्हाला प्रेमात पाडून लुबाडू शकते. तुमचा विश्वास बसत नसेलही पण ही गोष्ट प्रत्यक्षात घडलीय औरंगाबादमध्ये... आता असा हनी ट्रॅप थेट तुमच्या-आमच्या बाबतीत वापरला जाण्याचे प्रकार वाढलेत... म्हणूनच ही घटना जाणून घेणं महत्त्वाचं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे सगळं आम्ही तुम्हाला सांगतोय, कारण औरंगाबादमध्ये एक धक्कादायक प्रकार घडलाय. औरंगाबादमधल्या मॉलमध्ये एका सुंदर तरुणीनं एका तरुणाशी लगट करुन ओळख करुन घेतली. मग संबंध वाढत गेले, तिनं या सगळ्याचं व्हिडिओ शूटिंग केलं आणि त्या तरुणाला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. धक्कादायक म्हणजे, त्या तरुणानंही धमक्यांना घाबरुन पाच लाख रुपये त्या तरुणीला दिले.


या तरुणाचे वडील विधानसभा निवडणूक लढवत होते, त्या पार्श्वभूमीवर क्लिप व्हायरल करण्याची ती मुलगी धमकी देत होती. ती मुलगी फरार आहे, पण तिच्या साथीदारांना अटक करण्यात आलीय, अशी माहिती पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी दिलीय. 


सध्या हे 'हनीट्रॅप'चे प्रकार वाढलेत. श्रीमंत घरच्या तरुणांना टार्गेट करण्यात येतं. त्यामुळे उगाच कुणाच्या गोड हसण्याला आणि इशाऱ्यांना भुलू नका... दिखावे पे ना जाओ, अपनी अकल लगाओ