Accident In Mumbai : मुंबईतील मुलुंडमध्ये हिट अँड रनची घटना घडली आहे.  भरधाव कारने स्कुटीला धडक दिली. यानंतर कारने पादचाऱ्याला  धडक दिली. या भीषण अपघातात स्कुटीचालकाचा जागीच मृत्यू झाला. तर, पादचारी जखमी झाला आहे. अपघातानंतर दुर्घटनाग्रस्त कार रस्त्यावर सोडून तरुण-तरुणी फरार झाले. हा अपघात इतका भीषण होता स्कुटीचे तीन तुकडे झाले  आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुलुंडच्या देवी दयाल रोड परिसरामध्ये हा अपघात घडला आहे.  हिट अँड रनची ही घटना आहे. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, एक जण गंभीर जखमी झाला आहे.  मुलुंडच्या देवी दयाल गार्डन परिसरामध्ये भरधाव वेगाने येणाऱ्या कारने सुरुवातीला स्कुटी चालकाला उडविले त्यानंतर याच परिसरातून रस्त्याच्या कडेने नाईट वॉक करणाऱ्या एका नागरिकाला या कारने धडक दिली. यातनंतर ही कार थेट गुरुकृपा बिल्डिंगच्या गेटवर जाऊन धडकली. 


अपघातानंतर कारमधील तरुण तरुणी फरार


या अपघातानंतर कारमध्ये असलेले दोन तरुण आणि एक तरुणी घटनास्थळावरून फरार झाले. तर, एक तरुणी पळण्याच्या तयारीत असताना नागरिकांनी तिला पकडलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. या चौघांनी अमली पदार्थाचं सेवन केलं असल्याचं प्रत्यक्ष दर्शन कडून सांगण्यात येत आहे. कारची धडक इतकी भीषण होती की स्कुटीचे तीन तुकडे झाले आणि स्कुटी चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. 


विक्रोळीत डंपरची डिव्हायरला धडक


मुंबईतल्या विक्रोळीत मुंबईच्या दिशेने जाणा-या उड्डाण पुलावर एक डंपर डिव्हायडला धडकून अपघात झाला. यात एका रिक्षाचाही अपघात झाला. सुदैवाने या अपघातातले दोन्ही चालक सुखरुप आहेत. मात्र वाहतूक कोंडीमुळे सकाळी ऑफिसला जाणा-यांना काही काळ नाहक त्रास सहन करावा लागला. 


कार दरीत कोसळली


भोरजवळील शिरगावच्या वरंध घाटात कार दरीत कोसळली. रस्त्याचा अंदाज न अल्यानं अपघात झाला. यात कारचालक थोडक्यात बचावलाय..रस्त्याच्या कडेला संरक्षण कठडे नसल्यानं हा अपघात झालाय. त्यामुळे कठडे बांधण्याची मागणी वाहन चालक करत आहेत.


कार थेट 40 फूट खाली कोसळली


समृद्धी महामार्गावर अपघाताचं सत्र सुरूच आहे. शिर्डीहून मुंबईकडे जाणाऱ्या कारचा नाशिक जिल्ह्यातील सिन्नरमध्ये अपघात झालाय. आगासखिंड इथल्या पिलरचा कठडा तोडून कार थेट 40 फूट खाली कोसळली. यात तीन जण जखमी झाले आहेत.