प्रशांत परदेशी, प्रतिनिधी, झी मीडिया, सांगखेडात, नंदुरबार : देशातील सर्वात जुनी आणि ज्या अश्व यात्रेतून छत्रपती शिवाजी महाराजही आपल्या घोडदलासाठी घोडे खरेदी करत, त्या सारंगखेड्याच्या अश्व बाजारात चर्चा आहे ती ऑस्कर आणि बाहुबली या रुबाबदार अश्वांची.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रंग, चाल, प्रजाती, उंची आणि शुभ लक्षणांच्या बळावर हे दोन्ही अश्व देशातील सर्वोत्तम अश्वांपैकी एक आहेत.  ऑस्कर तब्बल 1 कोटी अकरा लाख तर बाहुबली 50 लाख रुपये किमतीला मागितले गेले आहेत. या दोंघांना एक नजर पाहण्यासाठी अश्व प्रेमींची झुंबड उडतेय.


सारंगखेडा ही जातीवंत अश्वांची पंढरी का आहे हे आपल्याला ऑस्कर या मारवाड प्रजातीच्या अश्वाला पहिले की लक्षात येईल. अहमदनगर मधील स्टंड फार्म हाऊसचे राजसाहेब कुंटे  यांनी ऑस्कर हा रुबाबदार अश्व सारंगखेडा यात्रेत प्रदर्शनासाठी आणला आहे.


आपल्या रंगाने आणि ढंगाने ऑस्कर पहिल्या नजरेत समोरच्याला जिंकून घेतो. हा देखणा अश्व कोटीची उड्डाणं घेणारा ठरला आहे. सहा अश्व प्रदर्शन स्पर्धा पटकावण्याची विक्रम ऑस्करच्या नावावर आहे.


ऑस्करची उंची ६५ इंच आहे तर  हा पिवर मारवाड बीटचा घोडा असून त्याचा रंग पूर्ण काळा आहे. त्याचे चार पाय पांढरे  त्याच्यात सर्व शुभ लक्षणे आहेत.  त्याचा कपाळा वर राजतिलक आहे, असा अश्व दुर्मिळ आसतो तो  चालण्यात तरबेज असून खास शैलीत नाचतोही.


ऑस्करनंतर सारंगखेडा घोडे बाजारात सर्वांचे आकर्षण आहे ते  बाहुबली हा घोडा. या घोड्याचे वैशिष्ट्ये म्हणजे तो खास रेससाठी तयार करणायत आला आहे. या घोड्याची उंची ६४ इंच आहे. तो देवमन आणि कंठ हे शुभ लक्षणे आहेत त्याची किंमत 50 लाख आहे. हा फक्त २४ महिन्याचा असून त्याची उंची वाढणार आहे. २४ महिन्यांचा बच्चा प्रकारात बाहुबली हा सर्वात उंच घोडा आहे.


सारंगखेड्याच्या घोडे बाजारात एकापेक्षा एक जातीवंत आणि उमदे घोडे विक्रीसाठी येत असतात मात्र घोडा खरेदी करणे प्रत्येकाला शक्य नाही. म्हणून देश भरातील घोडे शौकीन हे घोडे पाहून धान्यता मानत असतात.


या अश्व बाजारात देशाच्या कानाकोप-यातून अश्व शौकीन आणि व्यापारी हजेरी लावत असतात, ते खास ऑस्कर आणि बाहुबली सारख्या जातीवंत अश्वांना पाहण्यासाठी आणि खरेदी करण्यासाठीच. काळ कितीही बदला तरी शौर्य आणि शक्तीची प्रतीक असलेल्या या अश्वांमध्ये आजही संमोहिनी कायम आहे.