गोंदिया : House burnt down in Gondia: एक धक्कादायक बातमी. मुलीच्या लग्नासाठी बापाने जीवाचे रान करुन लग्नाचे साहित्य, वस्तू जमविल्या होत्या. काही दिवसात मुलीचे लग्न होते. मात्र, वडील आणि मुलीवर असा प्रसंग ओढावला की, त्यांना रस्त्यावर राहण्याची वेळ ओढवली. लग्नापूर्वीच घर जळून झाले खाक झाले. लग्नासाठी खरेदी केलेल्या वस्तुची राखरांगोळी झाल्याने वडिलांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'देवा तुझ्या गाभाऱ्याला उंबरठाच नाही.....सांग कुठं ठेऊ माथा कळतच नाही...' ही दयनीय स्थिती गोंदियातील एका मुलीच्या बापाची झाली आहे. काही दिवसांवर आलेले मुलीचे लग्न आणि त्यापूर्वीच घराला आग लागून घरासह लग्नासाठी खरेदी केलेल्या वस्तुची झालेली राखरांगोळी झाली. यामुळे टेकाम कुटुंब मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहे. घर गेले आणि त्याच्यासोबत सगळे जमविलेले जळून गेले. हे कुटुंब रस्त्यावर आलेय.


अर्जुनी मोरगांव तालुक्यातील गोठनगाव येथील दुर्दैवी टेकाम कुटुंब! मनोहर टेकाम यांच्या मुलीचे 25 एप्रिल रोजी लग्न होणार होते! त्यापूर्वीच मोठे आभाळ त्यांच्यावर कोसळले. आपली मोलमजूरी करून जमवलेली कमाई मुलगी मनीषा हिच्या लग्नासाठी खर्च करून टाकली. लग्नाला लागणारे कपडे, अन्नधान्य, दागिने सर्व खरेदी करून त्यांनी जमा करून घरात ठेवले. आता घर सुंदर दिसावं म्हणून त्यांनी घराला रंगरंगोटी करणासाठी सर्व सामान घरात आणून ठेवले. 


टेकाम कुटुंब रात्री झोपी गेले. मात्र काळाच्या मनात अजुन काही दूसरे शिजत होतं. रात्री अचानक आरडाओरड सुरु झाली, टेकाम कुटुंब घाबरुन गेले. घराबाहेर आल्यानंतर आगीत डोळ्यासमोर घर जळताना पाहून त्यांना मोठा धक्का बसला. आगीचा भडका उडून आगीने रौद्र रूप धारण केले होते. डोळ्यासमोर आपले राहते घर आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याचे दिसताच मुलीच्या बापाचा काळजा ठोका चुकत होता. लोकांना मदतीने आग विझली खरी. मात्र लग्नासाठी खरेदी केलेल्या समानाची राख रंगोळी झाली. 


मनोहर यांनी आपले घर कसे बसे उभे केले होते. आता घर नाही आणि मुलीच्या लग्नाचे साहित्यही जळून खाक झाल्याने मुलीचे लग्न लावायचे कसे, असा त्यांच्यासमोर मोठा प्रश्न उभा राहिला आहे. सुखी जीवनाच्या स्वप्नात असलेल्या मुलगी मनीषा हिचा चिंतेत भर पडली आहे ती आता माझे वडील काय करणार याची. मुलीची आई पूर्णपणे हताश झाली आहे. आता आमचं काहीही राहिलं नाही, तर जगून काय उपयोग, अशी खंत व्यक्त केली. तर आपल्या वडिलांची स्थिती पाहून मनिषा चिंताग्रस्त आहे. 


आगीत होत नव्हतं सगळ हिरावुन गेलं आहे. लग्नाची तारीख जवळ येत असताना आता काय करावं, असा प्रश्न या पीडित कुटुंबाला पडला आहे. आता हे कुटुंब आर्थिक मदतीच्या प्रतिक्षेत आहे.