Mhada Lottery 2023 :  मुंबईकरांसाठी एक खास खुशखबर आहे. म्हाडा मुंबई मंडळाच्या 4 हजार 082 घरांची लवकरच सोडत 
कधी निघणार याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले होते (Mhada Lottery 2023). अखेर या सोडतीला मुहूर्त मिळाला आहे. ऑगस्ट महिन्यातच म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या घरांच्या लॉटरीची सोडत निघणार आहे. गृहनिर्माणमंत्री अतुल सावे (Housing Minister Atul Save) यांनी याबाबत मोठी घोषणा केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या घरांची येत्या 14 ऑगस्टला लॉटरी काढली जाईल, अशी माहिती गृहनिर्माणमंत्री अतुल सावे यांनी दिली.. सावे यांनी आज गृहनिर्माण खात्याचा आढावा घेतला, त्यानंतर ते बोलत होते. गिरणी कामगारांच्या घरांच्या प्रश्नातही लक्ष घालण्याचं आश्वासन त्यांनी यावेळी दिली. मुंबई मंडळाच्या म्हाडाच्या 4082 घरांची सोडत काढण्यात येणार आहे. 


राज्याचे गृहनिर्माण मंत्री  अतुल सावे यांनी या विभागाचा पदभार संभाळल्यानंतर आज प्रथमच म्हाडा कार्यालयात येऊन आढावा घेतला. येत्या 14 ऑगस्टला करण्याची घोषणा त्यांनी  केली आहे.  ही सोडत कुठे होणार याचे स्थळ लवकरच जाहीर करूअसेही अतुल सावे यांनी सांगितलं आहे. 


केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांचा म्हाडाच्या घरासाठी अर्ज 


केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांनी म्हाडाच्या घरासाठी अर्ज केलाय. म्हाडाच्या उच्च उत्पन्न गटातील ताडदेवच्या घरासाठी कराड लॉटरीच्या प्रतिक्षेत आहेत. साडेसात कोटींच्या घरासाठी त्यांनी अर्ज केलाय. कराड यांचं मुंबईत घर नाही, त्यामुळे त्यांनी कोट्यातून अर्ज दाखल केलाय. मुंबईत ताडदेव परिसरात म्हाडाची इमारत उभी राहात आहे. 142.30 चौरस मीटरच्या घरासाठी त्यांनी अर्ज केलाय. 


म्हाडाच्या 4 हजार 17 घरांसाठी गणेशोत्सवात सोडत 


कोकण मंडळाकडून म्हाडाच्या घरांसाठी पुन्हा लॉटरी निघाली आहे. यावर्षी 4 हजार 17 घरांसाठी गणेशोत्सवात सोडत काढण्यात येणार आहे. यासाठी अर्जविक्री आणि स्वीकृतीस ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू  होणार असल्याचे जाहीर करण्यात आले होत. कोकण मंडळातील विरार-बोळींज, डोंबिवली, बाळकूम, खोणी, शिरढोण, गोठेघर इथल्या घरांचा यात समावेश आहे.  
घरांच्या सोडतीसाठी येत्या आठ दिवसांत जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचं समजतंय. तर या घरांच्या किंमती 20 ते 40 लाख दरम्यान असण्याची शक्यता आहे.