मुंबई : राज्यात आजही अनेक भागात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. देशात महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असल्याने ही राज्यासाठी चिंतेची बाब आहे. प्रशासनाकडून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. पण नागरिकांनी देखील सूचनांचं पालन करण्याची गरज आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज वाढलेले कोरोना रुग्ण ( संध्याकाळी ७ वाजेपर्यंत) 


- जालना जिल्ह्यात कोरोनाचा १ रुग्ण आज आढळला आहे. भोकरदन तालुक्यातील पारध येथील १७ वर्षीय मुलीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.


- नवी मुंबईत आज १८ रुगणाची वाढ झाली आहे. त्यामुळे एकूण रुग्णाची संख्या २०६ वर पोहोचली आहे.


- लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे आणखी ०४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. उदगीर येथील कोरोना रुग्णांची संख्या ०७ वर पोहोचली आहे.


- बदलापूरात आणखी 3 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण वाढले असून एकूण रुग्णांची संख्या २५ वर गेली आहे. ज्यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे.


- पनवेल मध्ये 7 कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. ज्यामध्ये कळंबोली १, कामोठे २, खारघर ४ रुग्ण आहेत. पनवेलमध्ये आतापर्यंत एकूण ६३ कोरोनाबाधित रुग्ण. यातील २५ जण बरे झाले आहेत.


- यवतमाळमध्ये कोरोनाचा आणखी एक रुग्ण वाढला आहे. एकूण रुग्णांची संख्या ७६ वर पोहोचली आहे. 


- मालेगावात आज आणखी 11 रुग्णांची भर पडली आहे. मालेगावात रुग्णांची संख्या १८२ वर पोहोचली आहे.


- वसईत दिवसभरात एका कोरोनाबाधित रुग्णाची नोंद झाली आहे. दिवसभरात पाच जणांची कोरोनावर मात. वसईत कोरोना बाधितांचा आकडा १३० वर तर आठ जणांचा मृत्यू झाला आहे.


- उल्हासनगरमधील ८७ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. मृत्यूनंतर कोरोना पॉझिटीव्ह असल्याचा अहवाल आला आहे. उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची संख्या ८ वर पोहोचली आहे.


- दौंड तालुक्यात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. येथे पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळुन आला आहे.


- येवला शहरांमध्ये कोरोणाचा आणखी १ रुग्ण पॉझिटिव्ह आला आहे. 


- अमरावतीत आज एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळला असून येथे आतापर्यंत ७ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या २८ वर पोहोचली आहे.


- कल्याण डोंबिवली कोरोनाबाधित १३ नवीन रुग्ण आढळले आहेत. 
डोंबिवली पश्चिम- ४, डोंबिवली पूर्व - ५ नवीन, कल्याण पश्चिम- ३, कल्याण पूर्व १ 
कल्याण-डोंबिवलीत कोरोना बाधितांची संख्या १५६ तर ४६ जणांना डीचार्ज, मृत्यांची संख्या ३ वर


- साताऱ्यातील जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण, कराडमध्ये देखील अजून एक कोरोना रुग्ण वाढला. जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या झाली ४३ वर


- धारावीत १४ नवे रूग्ण वाढले, धारावीत आता एकूण कोरोना रूग्णांची संख्या पोहचली ३४४ वर. एकूण मृत्यू १४-


- अकोल्यात ५ नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. एकूण रुग्णांची संख्या २७ वर. आतापर्यंत तिघांचा मृत्यू