पुणे : पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्यावर चार हजार पंचेचाळीस कोटी रुपयांची देणी असल्याची माहिती आतापर्यंतच्या तपासात पुढे आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यातील अठ्ठावीसशे ब्यान्नव कोटी रुपये हे विविध बँकांची कर्जे आहेत. तर, अकराशे त्रेपन्न कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. 


डीएसकेंनी वेगवेगळ्या नावांनी 59 कंपन्या उभारल्या आहेत. त्या मार्फत डीएसकेंनी आर्थिक व्यवहार केले असल्याची माहितीदेखील तपासात पुढे आली आहे.


तपास यंत्रणांनी तज्ञामार्फत डीएसकेंच्या व्यवहारांचे ऑडिट करुन ही माहिती मिळवली आहे. सध्या डीएसके यांच्या पत्नी आणि मुलाकडे तपास सुरु आहे. मात्र, तपासात ते सहकार्य करत नसल्याचं पोलिसाचं म्हणणं आहे.