करोडपती बनायचं स्वप्न आहे? तर मग अशी करा बचत
कमी जोखीम घेत जास्तीत जास्त रिटर्न मिळवण्याचा प्रयत्न
नवी दिल्ली : कोरोनाच्या महामारीमुळे जगभरातील देश आर्थिक संकटात आहेत. यामुळे शेअर बाजारातील जोखीम देखील अधिक वाढली आहे. अशावेळी कमी जोखीम घेत जास्तीत जास्त रिटर्न मिळवण्यासाठी सर्वजण प्रयत्न करत आहेत. अशावेळी सरकारी गॅरंटी असलेल्या सेव्हींग स्किम्सवर सर्वांचा विश्वास असतो. खासकरुन कमी अवधीतील बचत योजनांच्या गुंतवणूकदार शोधात आहेत.
मार्केट एक्सपर्ट गुंतवणुकदारांना सुरक्षित गुंतवणुकीचा सल्ला देत आहेत. अशावेळी पब्लिक प्रोविडंट फंड (Public Provident Fund) मध्ये गुंतवणूक केल्याने चांगली गुंतवणूक तर होईलच सोबत श्रीमंत बनण्याचे स्वप्न देखील पूर्ण होणार आहे.
पब्लिक प्रोव्हीडंट फंड
थोडी थोडी गुंतवणूक करुन तुम्ही मोठी स्वप्न पूर्ण करु पाहत असाल तर पीपीएफ यामध्ये तुम्हाला मदत करेल. पब्लिक प्रोविडंट फंडचे एक विशेष म्हणजे बॅंकातील फिक्स डिपॉझिटच्या तुलनेत इथे अधिक व्याज मिळतं.
रिस्क नाही
पब्लिक प्रॉविडंट फंडची विशेष गोष्ट ही आहे की शेअर बाजार किंवा सोन्याच्या गुंतवणुकीच्या तुलनेत पीपीएफमध्ये कोणती जोखीम नाहीए. ही सरकारी गॅरंटीवाली स्किम आहे. अशामध्ये तुम्ही विना जोखीम सहजपणे पीपीएमध्ये चांगली बचत करु शकता.
टॅक्समधून सूट
पब्लिक प्रॉविडंट फंडमध्ये गुंतवणूक केल्यास इनकम टॅक्स एक्ट सेक्शन ८० सी अंतर्गत टॅक्समधून सूट मिळण्याचा फायदा होतो. त्यामुळे तुम्ही केवळ भविष्यासाठी बचतच नव्हे तर टॅक्स देखील वाचवणार आहात.
असे बना करोडपती
यावेळी पीपीए वर ७.१ टक्के व्याज मिळत आहे. जर तुम्ही १५ वर्षे दर महिन्याला ६ हजार रुपये गुंतवलात तर ३५ वर्षानंतर ही रक्कम एक कोटी इतकी होईल. ३५ वर्षे दरमहा ६ हजार रुपये आणि ७.१ टक्के व्याज मिळून ही रक्कम १ कोटी ८ लाख ९४ हजार ९८८ रुपये होईल.