Maharashtra HSC Exam : यवतमाळ/ परभणी : बारावीची परीक्षा सुरु झाली आहे. (HSC Exam) मात्र, काल चक्क इंग्रजीच्या पेपरमध्ये उत्तरच छापून आले होते. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना 6 गुणांची लॉटरी लागण्याची शक्यता आहे. हा धक्कादायक प्रकार पुण्यात उघड झाला. आता आणखी एक बातमी हाती आली आहे. बारावीचा इंग्रजीचा पेपर व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल झाला होता. हा पेपर फुटल्याने परीक्षाबाबत प्रश्चचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. यवतमाळ येथे इंग्रजीचा पेपर फुटल्याचे समोर आले आहे. तर दुसरीकडे धक्कादायकबाब म्हणजे बारावी इंग्रजीचा पेपर फोडून विद्यार्थ्यांसाठी कॉपी तयार करणाऱ्या परभणीतील सहा शिक्षकांविरोधात (Teacher) अखेर गुन्हा दाखल झाला आहे. 


परभणीत सहा जणांवर गुन्हे दाखल


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यवतमाळच्या मुकुटबन येथे बारावीचा इंग्रजीचा पेपर सुरु झाल्यानंतर काही क्षणातच व्हॉट्सअपवर व्हायरल झाला. हा प्रकार लक्षात आल्यावर परीक्षा केंद्रप्रमुखासह दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. दरमयान,  बारावी परीक्षांच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात कॉपीमुक्त अभियान राबवले जात असतानाच शिक्षकांनीच या अभियानाला हरताळ फासल्याचे समोर आले आहे. मराठवाड्यातील परभणीत बारावी इंग्रजीचा पेपर फुटला. हा पेपर फोडून विद्यार्थ्यांसाठी कॉपी (Copy) तयार करणाऱ्या परभणीतील सहा शिक्षकांविरोधात (Teacher) अखेर गुन्हा दाखल झाला आहे. या सहा शिक्षकांना अटक करण्यात आली आहे. कालिदास कुलकर्णी, बालाजी बुलबुले, गणेश जयतपाल, रमेश मारोती शिंदे, सिद्धार्थ सोनाळे आणि भास्कर तिरमले अशी अटक केलेल्या शिक्षकांची नावे आहेत.


 केंद्रपमुखासह दोघांवर गुन्हे दाखल


यवतमाळमधील मुकुटबन येथील आदर्श हायस्कूल आणि पुनकाबाई आश्रम शाळा हे दोन केंद्र समाविष्ठ असून, दोन्ही केंद्रांवर मंगळवारी परीक्षेला सुरुवात झाली. बारावीचा इंग्रजी विषयाचा पेपर सुरु असताना अर्ध्या तासातच आश्रम शाळेतील खोलीनंबर आठमधून इंग्रजी पेपरच्या प्रश्नपत्रिकेचे चार पेज व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर व्हायरल झाले. त्यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली. 


पेपर फुटीच्या या प्रकारानंतर गटशिक्षणाधिकारी यांनी मुकूटबन पोलिसात तक्रार दिली. त्यावरुन केंद्रपमुखासह दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले. यामध्ये केंद्रप्रमुख अनिल दुर्लावार, पर्यवेक्षक प्रेमेंदर येलमावार आणि अन्य फोटो काढणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरुद्घ कलम 188 भादंवि 5 नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.