HSC Exams 2023 : बारावीचे पेपर नक्की कोणी काढले?, इंग्रजी पेपरनंतर आता हिंदीच्या प्रश्नपत्रिकेत `ही` चूक
HSC Exam : बारावीच्या परीक्षेसंदर्भात महत्त्वाची बातमी. इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेत झालेल्या चुकीनंतर ( HSC Exam Mistake ) आता हिंदी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत चुका झाल्याचं समोर आले.
HSC Exam : बारावीच्या परीक्षेसंदर्भात महत्त्वाची बातमी. इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेत झालेल्या चुकीनंतर ( HSC Exam Mistake ) आता हिंदी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत चुका झाल्याचं समोर आले. हिंदी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत दोन प्रश्नांमध्ये उपप्रश्न क्रमांक चुकीचे देण्यात आले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी नेमका उपप्रश्न क्रमांक काय टाकायचा या संदर्भात संभ्रम निर्माण झाला.
हिंदीच्या प्रश्नपत्रिकेत प्रश्न क्रमांक दोनमध्ये चार शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहायचे होते. मात्र, या शब्दांचे क्रमांक 1,2,1,2 असे देण्यात आले. हे क्रमांक 1,2,3,4 असे असायला हवे होते. तर चार समानार्थी शब्द लिहिण्यासाठी दिलेल्या चारही शब्दांना 1,1,1,1 असे क्रमांक देण्यात आले.हे क्रमांक 1,2,3,4 असे असायला हवे होते.
अरे चाललंय काय? बारावीची परीक्षा आहे की... 'पेपर फुटला, व्हॉट्सअॅपवर व्हायरल'
बारावीची परीक्षा सुरु झाली आहे. (HSC Exam) मात्र, सोमवारी चक्क इंग्रजीच्या पेपरमध्ये उत्तरच छापून आले होते. (Maharashtra HSC Exams 2023 ) त्यामुळे आता विद्यार्थ्यांना 6 गुणांची लॉटरी लागण्याची शक्यता आहे. हा धक्कादायक प्रकार पुण्यात उघड झाला. त्यानंतर आणखी एक बातमी समोर आली आहे. बारावीचा इंग्रजीचा पेपर व्हॉट्सअॅपवर व्हायरल झाला होता. हा पेपर फुटल्याने परीक्षाबाबत प्रश्चचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. यवतमाळ येथे इंग्रजीचा पेपर फुटल्याचे समोर आले आहे. तर दुसरीकडे धक्कादायकबाब म्हणजे बारावी इंग्रजीचा पेपर फोडून विद्यार्थ्यांसाठी कॉपी तयार करणाऱ्या परभणीतील सहा शिक्षकांविरोधात (Teacher) अखेर गुन्हा दाखल झाला आहे.
6 शिक्षकांना अटक
दरम्यान, बारावी परीक्षांच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात कॉपीमुक्त अभियान राबवले जात असतानाच शिक्षकांनीच या अभियानाला हरताळ फासल्याचे समोर आले आहे. मराठवाड्यातील परभणीत बारावी इंग्रजीचा पेपर फुटला. हा पेपर फोडून विद्यार्थ्यांसाठी कॉपी (Copy) तयार करणाऱ्या परभणीतील सहा शिक्षकांविरोधात (Teacher) अखेर गुन्हा दाखल झाला आहे. या सहा शिक्षकांना अटक करण्यात आली आहे. कालिदास कुलकर्णी, बालाजी बुलबुले, गणेश जयतपाल, रमेश मारोती शिंदे, सिद्धार्थ सोनाळे आणि भास्कर तिरमले यांचा समावेश आहे.