HSC Exams News : बारावी परीक्षेच्या धर्तीवर बोर्डाची मोठी घोषणा; आताच लक्ष द्या
HSC Exams News : परीक्षा तोंडावर आलीये, शेवटची उजळणी सुरुये. अशा वातावरणातच बोर्डाकडून काही महत्त्वाच्या गोष्टींकडे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांचं लक्ष वेधण्यात आलं आहे.
HSC Exams News : बारावीच्या परीक्षांना एक दिवस उरलेला असतानाच महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं एका पत्रकार परिषदेच्या माध्यमातून विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना संबोधित केलं. यावेळी बोर्डाकडून राबवण्यात येणारं कॉपी मुक्त अभियान त्यांनी अधोरेखित केलं. शिवाय यंदाच्या वर्षीपासून विद्यार्थ्यांना परीक्षेदरम्यान 10 मिनटं जास्तीचा वेळ दिला जाणार असल्याचंही बोर्डाकडून सांगण्यात आलं. पेपरच्या शेवटी ही दहा मिनटं देण्यात येतील.
परीक्षेविषयीची काही महत्त्वाचे मुद्दे...
इयत्ता 12 वी साठीची लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी ते 21 मार्च या कालावधीत पार पडेल
यंदाच्या वर्षी 14 लाख 57 हजार 293 विद्यार्थी परीक्षा देणार असून. ही आत्तापर्यंतची सर्वाधिक संख्या आहे.
तब्बल 3196 मुख्य केंद्रावर ही परीक्षा पार पडेल.
परीक्षेसाठी यंदा मुलींची 6,64,461 इतकी संख्या असेल, तर मुलांची संख्या लाखांवर असेल.
यंदाच्या वर्षी बोर्डाकडून कॉपी मुक्त अभियान राबवण्यात येणार आहे. ज्यामुळं भरारी पथकं आणि बैठी पथकं केंद्रांवर असणार आहेत.
विद्यार्थ्यांना पेपर लिहिताना शेवटी 10 मिनिंटांचा वेळ त्यांना वाढवून देण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून तयारी पूर्ण परीक्षेसाठीची तयारी आता पूर्ण झाली असून, प्रत्येक केंद्रावर किमान 50 मीटर अंतरावर कोणत्याही व्यक्तीला (विद्यार्थ्यांव्यतिरिक्त) फिरकण्याची परवानगी नसेल. शिवाय प्रत्येक परीक्षा केंद्रापासून 50 मीटर अंतरावर झेरॉक्सची दुकानंही बंद ठेवण्यात येतील.
हेसुद्धा वाचा : SSC-HSC Board Exam 2023 : दहावी-बारावी परीक्षेसंदर्भात मोठी अपडेट, Examला उशीरा झाला तर...
सुरक्षेच्या कारणास्तव पेपर कस्टडी नेताना जीपीएस लावण्यात येणार आहेय उच्च शिक्षण विभाग, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचा संप असला तरी सुद्धा 12 वी परीक्षेाच एक भाग असणारी Practical Exam पार पडली आहे. तरीही जर, कोणत्या महाविद्यालयातून ही परीक्षा राहिली असल्यास विद्यार्थी लेखी परिक्षेनंतर प्रॅक्टिकल्स देऊ शकणार आहेत.