मुंबई: राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. कोरोनाचा धोका लक्षात घेऊन अनेक शहरांमध्ये सुरू करण्यात आलेल्या शाळा पुन्हा बंद करण्यात आल्या आहेत. आता 10 वी आणि 12 वीची परीक्षा कशी होणार? ऑफलाइन होणार की ऑनलाइन याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. इतकच नाही तर वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या पाहता परीक्षा ऑनलाइन घेण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

10वी 12वीची परीक्षा दिलेल्या वेळापत्रकानुसार पार पडणार आहेत. शिवाय या परीक्षा ऑफलाइन होणार आहेत. ऑनलाइन परीक्षा घेण्यासंदर्भात अद्याप कोणतीही चर्चा अथवा निर्णय आलेला नाही. अशी महत्त्वपूर्ण माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. 


कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन पुढचे निर्णय घेणार. कोरोनाची परिस्थिती आहे त्यात मुलांची आरोग्य, सुरक्षा ही आमची प्राथमिकता आहे
खूप साऱ्या तज्ज्ञाशी शिक्षण विभाग बोलत आहे. तर पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांबाबतही लवकरच निर्णय घेणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे. 


कधी आहेत 10वी-12वीच्या परीक्षा?
  राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने 10वी आणि 12वीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. 23 एप्रिल ते 29 मे या महिन्यात बारावीची तर  29 एप्रिल ते 31 मे दरम्यान दहावीची ऑफलाइन पद्धतीनं  परीक्षा होणार आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल साधारणपणे जुलैअखेरीस तर दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल ऑगस्ट महिन्याअखेस लागणार आहे.