धुळे : राज्यात वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर औषधांचीही कमतरता भासत असल्याचे दिसून येत आहे. कोरोना रुग्णांवर उपचार करणारं रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी वाढू लागली आहे. कोरोना बाधित कुटूंबाला याचा फटका बसत आहे. रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी लोकांना मेडिकलचे उंबरठे झिजवावे लागत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोनानं डोकं वर काढल्यानं रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी वाढू लागलीय. धुळे जिल्ह्यात कोरोना रूग्णांना इंजेक्शन मिळत नसल्यानं रूग्णांचा जीव टांगणीला लागलाय. 


अनेक मेडिकल दुकांनांचे उंबरडे झिजवल्यानंतरही रूग्णाच्या नातेवाईकांना रेमडेसिवीर मिळत नाही अशी स्थिती आहे. तर आम्ही 100-100 इंजेक्शनची मागणी नोंदवूनही इंजेक्शन मिळत नसल्यानं नाईलाज होत असल्याचं मेडिकल चालकांचं म्हणणं आहे. 


एकीकडे रेमडेसिवीर इंजेक्शनअभावी रूग्णांचा जीव टांगणीला लागलेला असताना अन्न आणि औषध प्रशासनाचे अधिकारी मात्र जिल्ह्यात पुरेसा साठा असल्याचं सांगतायेत.


खासगी हॉस्पिटलमध्ये या इंजेक्शनचा वापर सर्रासपणे सुरू असल्याचंही सांगण्यात येतंय.