मुंबई : राज्यात आज कोरोनाने पुन्हा एकदा धक्का दिला आहे. कारण राज्यात आत तब्बल 40,414 रुग्णांची वाढ झाली आहे. तर राज्यातील 108 लोकांना आपली जाव गमवावा लागला आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येने आज प्रशासनाची नक्कीच झोप उडवली असणार. कारण कोरोनाचा संसर्ग थोपवण्यात अपयश येत आहे. राज्यात होणारी वाढ ही चिंता वाढवणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्रात कोरोना बाधितांची संख्या आता 27,13,875 इतकी झाली आहे. महाराष्ट्रातील कोरोनामुळे मृतांचा आकडा 54,181 वर गेला आहे. महाराष्ट्रात आज 17,874 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला. महाराष्ट्रात आतापर्यंत 23,32,453 रुग्ण बरे झाले आहेत.


राज्यात कोरोनाचं थैमान सुरुच आहे. कोरोनाचा संसर्ग आता हाताबाहेर जातांना दिसत आहे. लोकांकडून नियमांचं पालन होत नाहीये. वारंवार आवाहन करुन इशारा देऊनही लोकांमध्ये कुठलही गांभीर्य आलेलं दिसत नाहीये. राज्यात आज वाढलेला आकडा हा फक्त प्रशासनासाठीच नाही तर राज्यातील प्रत्येक नागरिकांसाठी धोक्याची घंटा आहे. 


राज्यात लवकरच लॉकडाऊऩ होण्याची शक्यता आहे. कारण परिस्थिती हाताबाहेर गेली तर आरोग्य यंत्रणांवर मोठा ताण येणार आहे. यासाठी आज मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊनची तयारी करण्याचा सूचना देखील दिल्या आहेत. त्यामुळे परिस्थिती अशीच राहिली तर राज्यात लॉकडाऊऩ अटळ आहे.


संबंधित बातमी: निर्बंधांचे पालन होत नसल्याने लॉकडाऊनबाबत नियोजन करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश