नागपूर : नागपुरात कोरोनाचा प्रकोप सुरु झाला आहे. कारण आज कोरोनाचे 2297 कोरोना रुग्ण (Corona Patient) वाढले आहेत. नागपूर शहरात 1933 आणि ग्रामीण भागात 361 कोरोनाबाधितांची भर पडली आहे. तर आज कोरोनाच्या 12 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नागपुरात आज 1409  जण कोरोनामुक्त झाले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नागपुरात कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. महाराष्ट्रात नागपूर आता कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला आहे.  मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत आहे. जी चिंता वाढवणारी आहे. (huge spike in Corona patient in Nagpu)


वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आजपासून नागपूरात २१ मार्चपर्यंत लॉकडाऊन (Lockdown) जाहीर केला आहे.  पोलीस आयुक्त अमितेश कुमार स्वत: रस्त्यावर उतरून या लॉकडाऊनचा आढावा घेत आहेत. याआधी नागपुरात लॉकडाउनला लोकांचा अपेक्षित प्रतिसाद दिसला नाही. बाजारपेठ, दुकान बंद असले तरी रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची संख्या लक्षणीय आहे. (Lockdown in Nagpur)


नागपुरात आजपासून 21 मार्चपर्यंत लॉकडाऊन असणार आहे. या काळात नियम मोडणा-यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचं पोलीस आयुक्तांनी सांगितलं आहे. वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर हा लॉकडाऊन घेण्यात आला. आजपासून सुरू होणाऱ्या कडक लॉकडाऊनच्या अनुषंगानं शहरात 100 ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. शहराच्या सीमा आजपासून सील करण्यात आल्यायत. शहरात विनाकारण फिऱणाऱ्यांविरोधात कारवाई होणारेय.  गरज नसेल तर घराबाहेर पडू नका असं आवाहन पोलीस आयुक्तांनी केलं आहे.