विशाल करोळे, औरंगाबाद : एरव्ही नवऱ्याने छळले म्हणून महिला तक्रारी करतात. पोलिसांत जाऊन मदत मागतात. पण आता पुरुषांचाही देखील छळ होऊ लागला आहे. अगदी पोलीस ठाण्यात दाद मागण्याची वेळ या बिच्चाऱ्या पुरुषांवर आली आहे. (Husband Complaint Against His Wife) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बायकोच्या त्रासाला कंटाळले नवरे
आम्हाला बायकोपासून वाचवा
पत्नीपीडित नवऱ्यांची काकुळतीची हाक

 
एक दोन नव्हे, औरंगाबादमधल्या (Aurangabad ) तब्बल २०० हून अधिक नवरोबांनी आपल्या पत्नीविरुद्ध तक्रारी केल्या आहेत.(Husband Complaint To Save Him Form His Wife) भरोसा तक्रार सेलमध्ये. खरं तर पीडित महिला आणि मुलांसाठी हा सेल सुरू करण्यात आला. पण तिथं आता बायकोच्या (Wife)त्रासाला कंटाळलेल्या नवऱ्यांच्या तक्रारी वाढत आहेत. 


अशा एक ना अनेक तक्रारी...


- माझी बायको माझा छळ करते
- माझी बायको मला समजून घेत नाही
- आईवडिलांसोबत राहायला नकार देते
- मोबाईलच्या नादात संसाराकडं दुर्लक्ष होतंय
- सासरची मंडळी माझा छळ करतात
- सासू-सासरे बायकोला नांदायला पाठवतच नाहीत. 
 
यातल्या काही तक्रारी समुपदेशनानं सोडवण्यात पोलिसांना यश आलं. काही प्रकरणात मात्र परिस्थिती काडीमोडापर्यंत पोहोचलीय. त्यामुळं पोलिसांना देखील मानसोपचारतज्ज्ञांची मदत घ्यावी लागत आहे. तर भरोसा सेल पोलीस निरीक्षक किरण पाटील यांनी सांगितले, नवऱ्यांच्या तक्रारीत वाढ होत आहे.



केवळ कायद्याचा दंडुका दाखवून सगळेच प्रश्न सुटत नाहीत. संसाराचा गाडा सुरळीत चालावा, यासाठी पोलिसांनाही सामोपचाराचा मध्यम मार्ग स्वीकारावा लागतो. पण वाढत्या तक्रारींमुळं पोलिसांचीही डोकेदुखी वाढलीय, एवढं नक्की.