पंढरपूर : प्रकाश आंबेडकर यांनी पंढरपुरात विठ्ठलाचं दर्शन घेतलं. ८ दिवसात मंदिर उघडण्याबाबत नियमावली जाहीर केली जाणार असल्याचं आश्वासन मिळालं आहे. पण १० दिवसात मंदिर उघडी नाही झाली तर पुन्हा पंढरपुरात येऊ अशा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं की, मुंबईतले अधिकारी संपर्कात होते. त्यांचं एकच तुणतुणं सुरु होतं. धार्मिकस्थळ उघडली तर कोरोना पसरेल. मी त्यांना म्हटलं की, सकाळी लवकर उठा आणि बाजारात फिरा. जेथे कुठलाही फिजिकल डिस्टंसिंग पाळलं जात नाही. येथे कोणाला कोरोना झाला का? हे सांगावं. लॉकडाऊनमुळे देशभरात ८५ लाख लोकं शहर सोडून गावात गेले. शेकडो किलोमीटर चालत गेले. ज्या ज्या गावातून हे लोकं गेली, तेथे लोकांनी त्याला मदत केली. त्यांनी त्या गावात कोरोना पसरवला हे मला सांगा.


- मोदींचा ही स्वॅप घ्या. ते कोरोना पॉझिटिव्ह निघणार नाहीत. ते कोविड १९ पॉझिटिव्ह नाही निघणार.


- मंत्रालयातून निरोप आला, मंदिर, मस्जिद आणि प्रार्थना स्थळी जाण्यासाठी नियमावली तयार केली जाईल.


-  डॉक्टर स्टाफचं अभिनंदन केलं पाहीजे, औषध नसतांना रुग्ण बरी झाली


- 85 टक्के लोक कोरोनातून बरे झाले असतील तर भिण्याचं कारण काय ?


- १५ जणांना जाऊ दिलं, म्हणजे आंदोलन यशस्वी झालं असं नव्हतं.


- आठ दिवसांत SOP जाहीर करू असं सांगितलं तेव्हा आंदोलन यशस्वी झालं. मंदिराचे दरवाजे उघडे केले, विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतलं तेव्हा खरं आंदोलन यशस्वी झालं असं वाटलं.


- मंदिर खुलं झालं आहे असं समजा. काही प्रमाणात शासनाच्या विरोधात जाऊ शकतो, काही प्रमाणात नाही करू शकत. दहा दिवसाचा इशारा दिला आहे. रस्त्यावर उतरायला लावू नका. आम्ही रस्त्यावर लढणारी माणसं आहोत.


- पंढरपूर प्रशासनाचे हार्दिक आभार. आंदोलन या ठिकाणी थांबवतो आहे. शासनाने जर दहा दिवसांत ऐकलं नाहीतर आम्ही पुन्हा याठिकाणी आल्याशिवाय राहणार नाही.