मुंबई : लॉकडाऊनचे परिणाम चांगले आणि वाईट होत असले तरी गरज पडली, तर लॉकडाऊन (Maharashtra Lockdown) लावावाच लागेल, असं ठोस वक्तव्य राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी केले आहे. लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) सर्व यंत्रणेशी चर्चा करत असल्याची माहितीही टोपे यांनी दिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र हे सांगताना पुढे टोपे असेही म्हणाले की आम्ही लगेचच लॉकडाऊनवर जाणार नाही, सध्या निर्बंध कडक करण्यावर भर दिला जाईल. मात्र सध्या यंत्रणेशी केली जाणारी चर्चा लॉकडाऊनच्या दिशेने जात असल्याचे टोपे म्हणाले आहेत.


मुंबईत सध्या सर्वाधिक नव्या कोरोनाग्रस्तांची (Mumbai corona) नोंद होत आहे. त्यामुळे तिथली रुग्णसंख्या कमी करण्यासाठी ट्रेसिंग, टेस्टिंग वाढवण्यात येत असल्याचे टोपेंनी सांगितले. मुंबईत एक-दोन वगळता हॉस्पिटलची कमतरता नसल्याचेही टोपेंनी आश्वस्त केले.


यावेळी राजेश टोपेंनी लसीकरणासंदर्भातही (Maharashtra corona vaccination) भाष्य केले. राजकीय पक्षाच्या नेत्यांनी आणि सामाजिक संघटनांनी वन बूथ, टेन यूथप्रमाणे तरूणांना विश्वासात घेऊन 45वर्षांवरील नागरिकांचं लसीकरण करून घ्यावे, असं आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले आहे.


तसेच वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मास्क घालणे, फिजिकल डिस्टन्स पाळणे, हात स्वच्छ धुत राहणे या त्रिसूत्रीचे पालन करा, असा पुनरूच्चारही राजेश टोपेंनी केला.