कल्याण : कोरोनाचा फैलाव सातत्याने होत आहे. लॉकडाऊन असताना नागरिक खरेदीसाठी गर्दीही करत आहेत. कोविड-१९चा प्रादुर्भाव होत असल्याने कल्याण-डोंबिवलीत अगोदर कंटेंटमेंट झोन जाहीर केले आहे. तसेच धोका लक्षात घेऊन अनेकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. मात्र, लोकांना क्वारंटाईन करुनही काही जण घराबाहेर फिरताना दिसत असल्याने कल्याण-डोंबिवली पालिकेने कडक इशारा देताना गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लॉकडाऊन असताना रुग्णांची सख्या कमी होत नसल्याने दोन तारखेपासून दहा दिवसाचा पुन्हा लॉकडाऊन घेण्यात आला आहे. वाढती रुग्णसंख्या पाहता पालिकेकडून ज्यांच्या घरात सुविधा आहेत, अशा रुग्णांना होम क्वारंटाईन केले जात आहे. मात्र काही रुग्ण या सुविधेचा गैरफायदा घेत नजर चुकवून घराबाहेर फिरत असल्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. असे रुग्ण सोसायटीच्या सदस्यांना न जुमानता बाहेर पडत असल्याने इतरांनाही कोरोनाची लागण होण्याचा धोका निर्माण झाला आहे. 


कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात असलेल्या नागरिकांना आपआपल्या घरात होम क्वारंटाईन करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. मात्र असे नागरिक  सोसायटीच्या सदऱ्यांना न जुमानता सऱ्हास बाहेर फिरत असल्याचे पालिका आयुक्तांच्या निदर्शनास आल्याने क्वारंटाईन केलेले जे नागरिक घराबाहेर पडतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी पोलिसांना दिले आहेत. दरम्यान, पालिकेने कडक भूमिका घेतल्याची माहिती केडीएमसी आरोग्य विभाग अधिकारी डॉ. प्रतिभा पानपाटील यांनी दिली.