लोणावळा : पावसाळ्यात तुम्हालाही भूशी डॅमच्या सौंदर्यानं आकर्षित केलं असेल आणि तुम्हीही या ठिकाणाला भेट द्यायचा प्लान केला असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लोणावळ्यातल्या भुशी धरणाकडे जाणाऱ्या रस्त्यावर दुपारी तीन वाजल्यानंतर वाहनांसाठी प्रवेशबंदी करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे.


त्याचसोबत शनिवार, रविवारसह सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी लोणावळा गावात जाणाऱ्या लक्झरी बस, मिनी बस, टेंपो ट्रॅव्हलरसह अवजड वाहनांवर पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे. भुशी धरण, टायगर्स पॉईंट तसेच लायन्स पॉईंट संध्याकाळी ५ वाजल्यानंतर बंद करण्यात येणार आहे. 


पावसाळा सुरु झाल्यापासून शनिवारी आणि रविवारी लोणावळ्यात पर्यटकांच्या वाहनांमुळे होणाऱ्या कोंडीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलाय.