सोनू  भिडे, नाशिक:- 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या बाजारात बटन स्टार्ट (Key Less) असलेल्या गाड्यांची मागणी वाढली आहे. या गाडीत अनेक तांत्रिक सुविधा देण्यात आल्या आहेत. मात्र याच नवनवीन तांत्रिक सुविधा चोरांसाठी फायद्याच्या ठरत आहेत. कार चालू करण्यासाठी चाबीची गरज नसल्याने गाडी चोरणे सहज शक्य झाले आहे. यामुळे शहरात गाडी चोरीचे प्रमाण वाढले आहे. 


एकाच दिवशी तीन गाड्यांची चोरी 
नाशिक शहरात (Nashik City) एकाच दिवशी तीन ह्युंदाईच्या क्रीटा (Hyundi Creta) कारची चोरी करण्यात आली आहे. या तीनही कार पहाटे चा ते पाच वाजेच्या दरम्यान चोरी करण्यात आल्या आहेत. राका कॉलनी  येथून पहाटे साडे चार वाजेला कार चोरण्यात आली. तर जवळच असलेल्या गंगापूर रोडवरील व्ही. एन.  नाईक कॉलेज जवळून दुसरी तर तिसरी कार कामगार नगर मधून चोरण्यात आली आहे. या तीनही कार थोड्या थोड्या अंतराच्या वेळाने चोरण्यात आल्या आहेत. याचा गुन्हा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. 


अश्या प्रकारे करण्यात आली चोरी 
पहाटेची (Mornign) 3 ते ५ वाजेच्या दरम्यानची झोप हि साखर झोप असते अस म्हणतात. याचा फायदा सध्या चोर घेत आहेत. पहाटे ४ वाजेच्या सुमारास एक कार शहरात प्रवेश करते या कार मध्ये तीन ते चार चोर असतात. बिल्डींगच्या बाहेर किंवा बंगल्याच्या बाहेर उभ्या असलेल्या कार चोरण्याच ध्येय चोरांच असत. भिंतीला लागून उभे असलेल्या कारच्या खिडकीची काच फोडून आत प्रवेश केला जातो. डिव्हाईसचा वापर करून गाडीचे लॉक ओपन केले जातात. कार चालू करण्यासाठी चाबीची गरज नसल्याने कार सहज चालू केली जाते. यानंतर  रात्रीच्या अंधारात कार शहराबाहेर बाहेर नेली जाते. 


अशी घ्या काळजी 
कार चोरीला जाऊ नये यासाठी कार चालकांनी काही  काळजी घेणे गरजेचे आहे. कारची तांत्रिक माहिती असलेले अतुल शिंदे यांनी खालील बाबी कारमध्ये असणे गरजेचे असल्याच म्हटलं आहे. 


१ कारमध्ये डॅश कॅमेरा (Dash Camera) असणे आवश्यक आहे. यामुळे गाडीत कोणी प्रवेश केला तर त्याची माहिती आपल्याला मोबाईल वर मिळू शकेल. 
2 गाडीला जीपीएस सिस्टीम (GPS System) लावणे आवश्यक आहे. या सिस्टीम मुळे आपली कार कुठे गेली याची माहिती आपल्याला सहज मिळू शकेल आणि कार शोधणे सहज शक्य होईल.


3 सीक्यूरीटी अलर्ट (Security Alart) हि सिस्टम गाडीत लावल्यास गाडीला थोडाही धक्का लागला तरी याची माहिती आपल्याला सहज मिळू शकेल. कारमध्ये कोणीही प्रवेश केला तर याची माहिती मोबाईल मिळू शकेल. यामुळे चोराला कारमध्ये प्रवेश करण शक्य होणार नाही.