Nanded Latest News :  गरमागरम वडापाव म्हणजे अनेकांचा जीव की प्राण...  मस्त गरम तळलेला चमचमीत वडा... लुशलुशीत पाव... वरुन लाल आणि हिरवी चटणी.. सोबतीला झणझणीत मिरची... वडापावच्या सोबतीला आलं घातलेला वाफाळता चहा म्हणजे जणू स्वर्गसुखच...मसालेदार पाणी, चिंचेची चटणी... बटाट्याने भरलेली चटपटीत आणि खुशखुशीत पाणीपुरी.. गरमागरम कांदेपोहे... मसालेदार पावभाजी, काठी रोल, छोले भटुरे... मसालेदार, चमचमीत चाटपासून ते दक्षिण भारतातल्या चवदार डोसे, उत्तप्पापर्यंत...  फक्त भूक भागवण्यासाठीच नाही तर आता खवय्यांच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी रस्त्यारस्त्यांवर गाड्या दिसतात... मात्र आता तुम्हाला चहा किंवा वडा पावची गाडी टाकायची असेल तर परीक्षा द्यावी लागणार आहे...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्ट्रीट फूड विकायचं असेल तर त्यासाठी विक्रेत्याला परीक्षा द्यावी लागणार आहे... 50 मार्क्सची ऑनलाईन आणि ऑफलाईन परीक्षा या विक्रेत्यांना द्यावी लागेल... केंद्र सरकारच्या भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने तसे आदेश काढले आहेत. अन्नपदार्थ विक्री करताना स्वच्छता असावी यासाठी अन्न आणि औषध प्रशासनाकडून हे प्रशिक्षण दिलं जाणार आहे.. 


रस्त्यावर अन्नपदार्थ विक्री करणा-यांसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने ही परीक्षा घेतली जाणार आहे. सध्या तरी ही परीक्षा बंधनकारक नाही. मात्र भविष्यात ती बंधनकारक होऊ शकते.. हजारो, लाखो व्यावसायिक रस्त्यावर अन्नपदार्थ विक्री करतात. त्यातून आपले कुटुंब चालवतात. स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून अन्नपदार्थ विक्री करणाऱ्यांसाठी परीक्षा घेण्याच्या निर्णयाचं विक्रेत्यांनी स्वागत केलंय. मात्र रस्त्यावर खाद्यपदार्थ विकणारे अनेक जण अशिक्षित आहेत.. त्यामुळे परीक्षेऐवजी प्रशिक्षण देऊन वेळोवेळी तपासणी करावी अशी मागणी विक्रेते करतायत..