ठाणे : ठाण्यात पुन्हा एकदा अवैध ड्रग्जचा मोठा साठा हस्तगत करण्यात ठाणे पोलिसांना यश आलंय. या प्रकरणी एकाला अटकही करण्यात आलीय. सर्वसामान्यांकडून कफवर उपचार म्हणून वापरली जाणारी औषधं नशेसाठी वापरली जात असल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली होती. वागळे इस्टेट परिसरातील इटर्निटी मॉलजवळ एका कारमधून औषधांचा हा अवैध साठी आणण्यात येणार आहे, असंही पोलिसांना समजलं होतं. त्यानंतर ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या घटक क्रमांक 1 नं सापळ रचला आणि आरोपी अलगद या सापळ्यात सापडले. आरोपीकडून औषधांसहीत मोबाईल, कार असा एकूण 3,17,680 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सहायक पोलीस निरीक्षक अविराज कुराडे आणि अन्न व औषध प्रशासन विभागाच्या औषध निरीक्षक शुभांगी भुजबळ यांनी ही कारवाई केली. सोमवारी रात्री 9 च्या सुमारास पोपटी रंगाच्या गाडीवर संशय आल्यानं पोलिसांनी या गाडीला थांबवून चौकशी केली. यामध्ये खाक्या रंगाच्या बॉक्समध्ये कफ सिरपच्या 144  बाटल्या आढळल्या... त्यानंतर पोलिसांनी जोगेश्वरी इथं राहणाऱ्या श्रवण चौधरी याला ताब्यात घेतलं. 


श्रवणची कसून चौकशी केली असता या औषधांचा त्याच्याकडे कोणताही अधिकृत परवाना नसल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. या औषधांचा वापर नशेसाठी केला जात असल्याचंही श्रवणनं कबुली दिली.