मुंबई : राज्यातील सर्वात विक्रमी तापमान असलेल्या ठिकाणी पावसाच्या सरी बरसल्या. विदर्भातील रविवारी जोरदार पाऊस कोसळला. देशातील विक्रमी तापमान विदर्भात असल्याने पावसामुळे थोडासा दिलासा मिळाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वर्धा,अमरावतीत मेघगर्जना आणि वादळी वा-यासह जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे शेतातील भाजीपाला, आंबा, लिंबासह पिकांचे काही प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. 


वर्ध्यात 45.1 अंशावर पोहोचल्याने अनेकांना उन्हाचा तडाखा बसला होता. यात पाऊस पडल्याने दिलासा मिळाला.  पण, अचानक आलेल्या या पावसामुळे कारंजा शहरातील उप बाजार समिती प्रांगणात साठवून ठेवण्यात आलेला शेतमाल भिजला. 


अचानक आलेल्या पावसानं गहू, हरभरा, तूर भिजल्याने शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झालं आहे. राज्यात पुढचे दोन दिवस हलक्या स्वरुपाचा पाऊस राहिलं असा अंदाज हवामान विभागाने नोंदवला आहे. 


पुढचे दोन दिवस रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग याशिवाय पश्चिम महाराष्ट्रात पुढचे दोन दिवस पावसाचा इशारा देण्यात आला आहे. परभणी, बीड, हिंगोली, नांदेड लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.