पुढील 3 ते 4 तास धोक्याचे! मुंबई, पुण्यासह या भागांत अतिमुसळधार पाऊस; हवामान विभागाचा इशारा
Maharashtra Heavy Rain IMD Alert Today: मुंबई, ठाणे, रायगड, पुणे-साताऱ्यातील घाट परिसर, कोल्हापूरचा काही भाग, हिंगोली, यवतमाळ, परभणी आणि लगतच्या भागात जोरदार पाऊस पडणार आहे. यामुळे 3 ते 4 तास अधिक काळजी घेण्याची गरज आहे.
Maharashtra Weather Heavy Rainfall Alert Today: मुंबईत हवामान खात्यानं पावसाचा रेड अलर्ट (IMD Red Alert in Mumbai) जारी केला आहे. त्यातच आता हवामान खात्यातर्फे पावसाबाबत मोठी अपडेट देण्यात आली आहे. मुंबई, ठाणे, रायगड, पुणे-साताऱ्यातील घाट परिसर, कोल्हापूरचा काही भाग, हिंगोली, यवतमाळ, परभणी आणि लगतच्या भागात येत्या 3 ते 4 तासात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. यामुळे अधिक खबरदारी घेण्याची गरज आहे.
मुंबईत पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. बुधवारपासून धो धो पाऊस पडत आहे. गुरुवारी देखील मुंबईत पाऊस पडत आहे. यानंतर आता मुंबईत पाऊस अतीमुसळधार पाऊस कोसळण्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. मुंबईसह ठाणे, रायगड, पुणे-साताऱ्यातील घाट परिसर, कोल्हापूरचा काही भाग, हिंगोली, यवतमाळ, परभणी आणि लगतच्या भागात येत्या तीन ते चार तासात पावसाच्या जोरदार सरी पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मुंबईत तुफान पाऊस
मुंबई आणि परिसरात तुफान पाऊस पडत आहे. ठिकठिकाणी पाणी साचलं आहे. पश्चिम उपनगरातही पावसाचा जोर वाढला आहे. चर्चगेट, दहिसर, नालासोपारा, कल्याणमध्ये पाणी साचले आहे. डोंबिवली परिसरात देखील पाणी साचले आहे. मुंबईत जुलैमध्ये रेकॉर्डब्रेक पाऊस पडला आहे. 2020नंतर सर्वाधिक पाऊस झालेला जुलै महिना ठरला आहे. मुंबईत जुलैमध्ये 1557 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
ठाणे शहरात गेल्या 2 तासंपासून पावसाने चांगलाच जोर धरला
सकाळ पासून रिमझिम पडणाऱ्या पावसाने ठाणे शहरात गेल्या 2 तासंपासून चांगलाच जोर धरला आहे. शहर आणि परिसरात मुसळधार पाऊस कोसळत असून शहरातील मासुंदा तलावात मोठ्या प्रमाणात पाणी वाढले आहे..जोरदार पावसामुळे तालावपाळी परिसरातील जांभळी नाका येथील उड्डाणपूलाच्या खाली पाणी भरलं आहे तर वंदना परिसरात पाणी जमा झालंय. तर कळवा भागात रेतीबंदर खाडीकिनारी मित्रांसोबत मासे पकडायला गेलला एक जण नाल्यात बुडालाय. जोरदार पावसामुळे त्याला शोधायला अडचणी येत आहेत.
वसई विरार मध्ये दुपारनंतर पावसाचा जोर वाढला
सखल रस्त्यांवर पुन्हा पाणी साचायला सुरुवात झालीय. नालासोपारा पूर्वेकडील सेंट्रल पार्क, गालानगर, तुळींज रोड, एसटी डेपो, निळेगाव या भागात गुडघाभर पाणी साचलंय. हा पाऊस असाच सुरू राहिल्यास पुन्हा एकदा वसई विरार जलमय होण्याची शक्यता आहे. या साचलेल्या पाण्यामुळे वयोवृद्ध नागरिक, शाळकरी मुले यांना मोठी कसरत करावी लागतेय.नालासोपारा पश्चिमेकडील सोपारा गावात गुडघाभर पाणी साचले असून गेल्या आठ ते दहा दिवसापासून त्यांची पाण्यातून सुटका होत नाहीये. या परिसरातील खाड्यांमध्ये माती भराव केल्यामुळे ही परिस्थिती उद्भवल्याचा आरोप येथील ग्रामस्थांनी केला आहे.